नवी दिल्ली : आई आणि मुलाचे नाते (Mother And Son Relationship) हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि तसे ते आपण मानतो ही. हे नाते इतर कोणत्याही नात्यापेक्षा जास्त खास आणि मौल्यवान आहे. आई आणि मुलाच्या प्रेमाचे एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Video Viral On Social Media) आहेत. यातील अनेक व्हिडिओ आपल्या हृदयात जिवंत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या नेटिझन्सची मने जिंकत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक मूल (Son) सोसाट्याचा वारा (Strong Wind) आल्याने त्याच्या आईला मदत करताना दिसत आहे (Help To Mother). जे खूप काळजाला भिडणारे आहे.
अनेकदा आपण पाहतो की मुलं आपल्या पालकांना काम करताना पाहतात आणि त्यांच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, जो सर्वांना भावूक करत आहे. आई-वडिलांनी लावलेले दुकान पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यात वाहून जात होते, यावेळी या चिमुरड्याने दुकानाची ताडपत्री हातात घट्ट धरली होती. यानंतर दुकानातील खुर्ची उडून जाते, तीही हा मुलगा उचलून घेतो.
[read_also content=”पत्नीच्या प्रियकराची मर्डर, हत्या करून रेल्वे रुळांवर फेकला मृतदेह, कटात दोघांचाही होता सहभाग पण… https://www.navarashtra.com/crime/delhi-murder-of-wifes-lover-killed-and-threw-body-on-railway-tracks-both-were-involved-in-the-conspiracy-nrvb-400741/”]
इतक्या लहान वयात एवढा समजूतदारपणा दाखवणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून युजर्स या चिमुकल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 17 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-17-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]






