Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Parvesh Verma Viral Video: दिल्लीतील तिलक नगर परिसरात २७ सप्टेंबर रोजी PWD मंत्री प्रवेश वर्मा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी एका तरुणाने रस्त्याच्या खराब कामाबाबत सवाल केल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर प्रवेश वर्मा यांनी त्या तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप...

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 01:12 PM
Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तिलक नगरमध्ये रस्त्याच्या कामाच्या पाहणीदरम्यान वाद झाल्याचा दावा.
  • प्रवेश वर्मांनी तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा आरोप; VIDEO व्हायरल.
  • AAP ने कारवाई आणि माफीची मागणी केली; मंत्री कार्यालयाकडून गैरसमज झाल्याचे सांगितले.
दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याचं काम खराब झालं आहे असं सांगणाऱ्या एका तरुणाला थेट मंत्र्याने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही राग येईल. दिल्लीच्या तिलक नगर भागातील रविवारी 27 सप्टेंबरला PWD मंत्री प्रवेश वर्मा रस्त्याची पाहणी करायला गेले होते. तिथे एक तरुण आला आणि त्याने रस्त्याचा खराब भाग दाखवला. रस्त्यावर खड्डे आहेत, काम निकृष्ट झालं आहे, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर मंत्री एवढे भडकले की त्यांनी थेट त्या तरुणाच्या कानशिलात लगावली, असा आरोप होत आहे. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Parvesh Verma Viral Video:

नेमकं काय घडलं व्हिडीओमध्ये?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की मंत्री प्रवेश वर्मा अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर उभे आहेत. एक तरुण येतो आणि रस्त्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगतो. तो म्हणतो की इथलं काम नीट झालेलं नाही, बघा कसा रस्ता उखडला आहे. हे ऐकताच मंत्र्याचा पारा चढतो आणि ते त्या तरुणावर हात उगारतात. आजूबाजूला असलेले लोकमध्ये पडतात. तरुण पण घाबरून मागे सरकतो. हा व्हिडीओ कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर काही तासातच हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला.

#Delhi Minister Parvesh Verma Slaps a Young Man on Camera. The @AamAadmiParty shared this video, in which Delhi govt. minister #ParveshVerma is seen slapping a young man. AAP claims “some people were questioning the minister about alleged corruption in road construction”. pic.twitter.com/K1JaoZ1vxK — Ravinder Singh (@ravindraJourno) September 27, 2026

AAP ने भाजपला धरलं धारेवर

या घटनेनंतर आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. AAP चं म्हणणं आहे की, भाजपचे मंत्री जनतेचा आवाज दाबत आहेत. जर कोणी सामान्य माणूस प्रश्न विचारला तर त्याला मारहाण केली जाते, ही हुकूमशाही आहे.

AAP ने मागणी केली आहे की मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी. दिल्लीच्या जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, रस्त्याचं काम जर खराब असेल तर जनता विचारणारच. दुसरीकडे भाजपकडून अजून यावर काही स्पष्ट उत्तर आलेलं नाही. मंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे की व्हिडीओ नीट बघा, गैरसमज झाला आहे.

पण सोशल मीडियावर लोक मात्र संतापले आहेत. लोक म्हणत आहेत, आम्ही टॅक्स भरतो, रस्ता खराब असेल तर प्रश्न विचारणारच. प्रश्न विचारला म्हणून मारणार का? काही लोक म्हणत आहेत, निवडणुकी आधी हात जोडता आणि निवडणूक झाली की हात उगारता.एकंदरीत या एका थप्पडने दिल्लीच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. आता बघावं लागेल की सरकार यावर काय कारवाई करतं.7

Web Title: Parvesh verma viral video delhi road inspection slap controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • delhi
  • Poltical News
  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
2

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
3

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.