
AC Train Puja Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Viral Video: रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक तसेच सुखाचा मानला जातो. रेल्वेमध्ये प्रवास करताना काही नियम आहेत जे आपल्याला पाळणे आवश्यक आहे. हे नियम काय शिस्त राहण्यासाठी नाहीतर, हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आहे. मात्र काहीवेळ नकळत अशा काही गोष्टी हातांतून घडतातय. ज्यामुळे आपल्याबरोबरच इतर प्रवाशांच्या प्रवास धोकादायक ठरु शकतो. सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमुळे अशाच एका घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एसी डब्यातील वरच्या बर्थवर बसलेला एक प्रवासी पूजा करताना दिसतो. त्याने आपल्या जागेवर छोटा तेलाचा दिवा पेटवला होता. त्यासोबत अगरबत्तीही लावली होती. काहीवेळ तो शांतपणे प्रार्थना करत होता. हा प्रकार पाहून जवळील इतर प्रवाशांना मात्र चिंता वाटू लागली.(AC Train Puja:)
एका सहप्रवाशाने त्याच्याशी शांतपणे संवाद साधला. चालत्या रेल्वेत अशा प्रकारे उघडा दिवा लावणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले. अगरबत्तीचा धूर डब्यातील सुरक्षा यंत्रणेला सक्रिय करू शकतो, तसेच छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, हेही त्याने समजावून सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये कोणताही वाद न होता परिस्थिती शांत झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
Wildlife Rescue: जीवासाठी तासन्तास झुंज… पण मदत पोहोचण्याआधीच अस्वलासोबत घडलं भयंकर, video Viral
आजच्या आधुनिक रेल्वे डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक यंत्रणा बसवण्यात आलेल्या असतात. धूर निर्माण झाल्यास अलार्म वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण डब्यात गोंधळ उडण्याची शक्यता असते. याशिवाय चालत्या गाडीत जळता दिवा किंवा मेणबत्ती वापरणे धोकादायक मानले जाते.
🚆A video circulating on social media shows a passenger performing prayers on the upper berth of an AC train coach while lighting incense sticks and an oil lamp. A fellow passenger reportedly intervened, explaining that such acts can be dangerous. Smoke may trigger the train’s… pic.twitter.com/79SrmBnAdW — Jharkhand Rail Users (@JharkhandRail) July 26, 2026
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी श्रद्धा प्रत्येकाची वैयक्तिक बाब असल्याचे म्हटले. तर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. श्रद्धा मनात असते, तिच्यासाठी इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कृती टाळली पाहिजे, असे अनेकांनी नमूद केले.
दरम्यान, हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र, ही घटना नेमकी कोणत्या रेल्वेत घडली किंवा कधी घडली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक दाव्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.