New Mexico Bear Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
New Mexico Bear Viral Video: सध्या जंगलाची संख्या कमी झाल्याने प्राणी अन्नाच्या शोधात अनेकदा मानवी वस्तीमध्ये पाहायला मिळतात. अशाच एका दुर्देवी घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका अस्वलाच्या पिल्ल्याने चक्क 22 फूट उंच असलेल्या विजेच्या खांबावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र. त्याचा हा प्रयत्न तिच्याच जीवावर बेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना पाहून अनेकांचे ड़ोळे पाणावले आहेत.
ही घटना आहे अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील एका शांत आणि ग्रामीण परिसरात घडल्याचे सांगितले जाते. निर्जन रस्त्याच्या कडेला उभारलेल्या उंच विजेच्या खांबावर हे अस्वल चढले होते. ते इतक्या उंचीवर नेमके कशासाठी गेले आणि कसे गेले हे अजून निश्चित झाले नाही. नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन असे वाटते दिसते की, अन्नाचा वास आल्याने किंवा कुतूहलापोटी ते वर चढले असावे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाहीय. (Wildlife Rescue:)
👮♂️911 operator: “911 what is your emergency?” 😳Caller: “I’m calling to report a bear on top of a light pole.” pic.twitter.com/8g07ibZupQ — 👮♂️🚒 Tales of Badge & Blaze™ (@ScottEnlow) July 21, 2026
अस्वल खांबाच्या टोकाजवळ पोहोचताच ते उच्चदाबाच्या विजेच्या तारांच्या अगदी जवळ गेले. त्या तारांमधून हजारो व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह सुरू होता. काही क्षण स्वतःचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचा तारांशी संपर्क आला आणि जोरदार विजेचा धक्का बसला. त्यामुळे अस्वल गंभीर जखमी झाले.
याचदरम्यान त्या मार्गावरून जाणाऱ्या एका कुटुंबाने हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. मदत पोहोचेपर्यंत अस्वलामध्ये जीव असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ही घटना आणखी वेदनादायी ठरली.
👮♂️911 operator: “911 what is your emergency?” 😳Caller: “I’m calling to report a bear on top of a light pole.” pic.twitter.com/8g07ibZupQ — 👮♂️🚒 Tales of Badge & Blaze™ (@ScottEnlow) July 21, 2026
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. काहींनी अशा धोकादायक ठिकाणी प्राण्यांना जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. तर काहींनी जंगलातील अधिवास कमी होत असल्यामुळे प्राणी मानवी परिसराकडे वळत असल्याचे मत मांडले.
अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral
दरम्यान, हा व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @ScottEnlow या अकाउंटवरून शेअर करण्यात आल्याचे सांगितले जाते. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, हजारो प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. बहुतांश प्रतिक्रिया या अस्वलाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करणाऱ्या आहेत. काहींनी अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.






