एवढा निष्काळजीपणा! प्रवाशांचा जीवघेणा प्रवास पाहून येईल तुमच्याही अंगावर काटा ; भयावह Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ, तर कधी भयावह व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक असाच भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही रेल्वे प्रवासी ट्रेनच्या दोन कोचमध्ये धोकादायक ठिकाणी बसून प्रवास करत आहे. यामुळे त्यांचा गंभीर अपघात होण्याची, एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक हैराण झाले आहेत.
सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन लोक दोन रेव्ले डब्यांना जोडणाऱ्या भागावर बसून प्रवास करत आहेत. या लोकांना जीवाची कसलीही पर्वा नाही. या व्हिडिओमुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. कधी लोक ट्रेनला लटकून प्रवसा करत आहे, तर कधी धावत्या ट्रेनमध्ये चढत आहे. तर काहीजण ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करत आहे. अलीकडे लोक अशी जोखीम उचलताना आपल्या जीवाचा कसलाही विचार करत नाहीत. दररोज लाखो प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात.
व्हायरल व्हिडिओ
क्या आपने बुलेट ट्रेन् मे सफर किया हैं कभी? 🤐
नही किया तो आज कर लो 🚈 🚈🚈🚈🚈🚈 pic.twitter.com/DkOPn0DeJj — Sanjay Kalyan (@sanjaykalyan_) October 22, 2025
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sanjaykalyan_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत यमराज काका सुट्टीवर आहेत वाटतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाे किती निष्काळजीपणा आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने यांना घरदाराची काळजी वाटतं नाही का? यांना काय झाले तर यांच्या घरच्यांच काय होईल याच विचारपण करत नाहीत हे लोक असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.