ताजमध्ये कोल्हापूरी चप्पल अन् मांडी घालून बसणे म्हणजे कमीपणाचे लक्षण? मॅनेजरचा मराठी व्यक्तीवर राग अनावर, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणीने ताज हॉटेलच्या फाइन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या धक्कादायक अनुभवावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. श्रद्धा शर्मा असे या तरुणीनेचे नाव असून ती युअर स्टोरी या स्टार्टअपच संस्थापक आहे. तिने ताज हॉटेलमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
श्रद्धाने सांगितलेल्या माहितीनुसार, ती ताज हॉटेलमध्ये डायनिंग टेबलावर पांरपारिक भारतीय पद्धतीने मांडी घालून बसली होती. पण यामुळे हॉटेलच्या मॅनेजमेंटकडून तिचा अपमान करम्यात आला. श्रद्धाने सांगितले की, दिवाळीच्या रात्री दिल्लीच्या ताज हॉटेलच्या हाऊस ऑफ मिंग रेस्टॉरंटमध्ये ती आपल्या बहिणीसोबत डिनरला गेला होती. यावेळी ती खुर्चीवर आरमाशीरपणे पद्मासनात मांडली घालून बसली.
पण हॉटेलच्या मॅनेजमेंटने तिच्या बसण्यावर आक्षेप घेत तिला योग्य प्रकारमे बसण्याचा सांगितले. मॅनेजमेंटने म्हटले की, हे फाइन डायनिंग आहे, इथे श्रीमंत लोक येतात. यामुळ तुम्ही व्यवस्थत बसा. श्रद्धाने हा प्रसंग शेअर करत तिला खूप अपमानजनक वाटल्याचे म्हटले. तिने प्रश्न केला की माझी नेमकी काय चूक होती? मी केवळ मांडी घालून बसले होते. तिने म्हटले की एक सामान्य माणूस स्वत:च्या मेहनतीने पैसे कमावतो आहे, मानाने ताज हॉटेलमध्ये येत आहे. त्याला आपल्या देशात आजही अपमान सहन करावा लागत आहे.
व्हायरल व्हिडिओ
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है।
और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में?
क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb — Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
श्रद्धाने हा व्हिडिओ आपल्या एक्स हॅंडलवर @SharmaShradha शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकांनी म्हटले आहे की, जिथे अजूही काही गावांमध्ये लोकांना चप्पल काढून जावे, लागते तिथे ताज हॉटेलमध्ये अशी घटना सामान्य आहे, तर काहींनी हॉटेलवर केस करण्याची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.