काखेत कळसा नि गावाला वळसा! चेंडू समोर असूनही कितीतरी वेळ रापत राहिला ईशान किशन... सर्वत्र हास्याचा कल्लोळ; Video Viral
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल २०२५ सामना शनिवारी रंगला. या मॅच दरम्यान एक मजेदार किस्सा घडून आला जो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ क्रिकेटपटू इशान किशनचा असून यात त्याच्यासोबत एक मजेदार घटना घडल्याचे दिसून आले, त्यानंतर संपूर्ण स्टेडियमचा काय तर जगभर त्याच्यावर मिम्स व्हायरल होऊ लागले. याचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर शेअर केला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात ईशान किशन काहीसा गोंधळलेल्या स्थितीत दिसून येतो. घडलं असं की, मोहम्मद शमीच्या पहिल्या शतकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंग सरळ रेषेत फटका मारतो. यानंतर ईशान किशन चतुराईने चेंडू अडवतो मात्र तो बॉल मैदानातील जाहिरातीवर जाऊन थांबतो. आता यात विशेष म्हणजे, यावेळी त्या जाहिरातीवरील प्रिंटदेखील पांढऱ्या रंगाची असते, ज्यावर हा चेंडू जाऊन पडतो. यामुळे घडते असे की, ईशानला हा चेंडू नक्की कुठे आहे तेच उमजत नाही आणि कितीतरी वेळ ती तिथेच चेंडू शोधत राहतो. आता हे तर झालेच पण खरा ट्विस्ट तर अजून बाकीचं आहे.
ईशान किशनची ही अवस्था पाहून शेवटी पॅट कमिन्सन धाव घेतो आणि चेंडू पकडतो. त्यानंतर ईशान किशनच्या चेहऱ्याचे तीन तेरा वाजतात. आपण शोधत असलेला चेंडू हा आपल्या नजरेसमोरच होता ते त्याला समजते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येते. ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक आता या घटनेवर मिम्स शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @d_cricket_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता त्या ग्राउंड वरच्या पांढर्या add बंद होतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कर्णधार म्हणून पॅट कमिंग्ज, त्याला काय करायला लागत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कमिन्स बोलत असेल, तू आत चल तूला सांगतो मी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.