Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरकट्या प्लेटीत हात घालून चिमकुली भरू लागली पोटाची खळगी, दृश्य पाहून तुमचेही हृदय पिळवटून निघेल; Video Viral

Heart Touching Video Viral: एकीकडे लग्नाचा उत्साह अन् दुसरीकडे भुकेसाठीची तळमळ... व्हिडिओतील हे विदारक दृश्य तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. चिमुकलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2025 | 02:40 PM
खरकट्या प्लॅटित हात घालून चिमकुली भरू लागली पोटाची खळगी, दृश्य पाहून तुमचेही हृदय पिळवटून निघेल; Video Viral

खरकट्या प्लॅटित हात घालून चिमकुली भरू लागली पोटाची खळगी, दृश्य पाहून तुमचेही हृदय पिळवटून निघेल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

लग्नसमारंभ म्हटलं की, शाही जेवणाचा थाट हा असणारच. एकंदरीतच लग्नकार्यात एक वेगळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते, सर्वत्र आनंद आणि लग्नाचा जल्लोष मात्र अशाच एक लग्नातील एक हृदयद्रावक दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. एकीकडे लग्नाचा उत्साह आणि दुसरीकडे चिमुकलीचे ती वाईट अवस्था पाहून सर्वच भावुक झाले. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भयंकर शिक्षा! सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालत होता व्यक्ती तितक्यात जंगलाच्या राजाने जे केलं… आयुष्यभराची अद्दल घडली; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ एका लग्नसमारंभातील असल्याचे दिसून येत आहे. यावेळी लोक उत्साहाने लग्नाचा आनंद मिरवत असतात तर दुसरीकडे एक गरीब मुलगी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इथे ठेवलेल्या खरकट्या प्लॅटिनमधून उष्ट अन्न खाताना दिसली. काही मिनिटांपूर्वी पाहुण्यांनी जे खाल्ले होते आणि फेकून दिले होते तेच अन्न मुलगी टिपून टिपून खाते. मुलीच्या चेहऱ्यावर भुकेचा आक्रमकपणा नव्हता, फक्त एक नेहमीची सहजता होती जणू काही हे सर्व तिच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.

ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याचे डोळे पाणावले. चमकदार कपडे, सजवलेले टेबल, भव्य सजावट आणि चकाचक जागेत, एक लहान मुलगी कचऱ्यात टाकलेल्या अन्नाने पोट भरत आहे हे पाहून अनेकांना वाईट वाटले. एकीकडे आपला देश प्रगत होत आहे मात्र देशातील गरीब लोक आणखीन मागे पडत आहेत. संपूर्ण देशाला जीडीपीमध्ये झालेल्या वाढीचा अभिमान असताना, हे दृश्य आपल्याला आठवण करून देते की गरिबी आणि उपासमार अजूनही आपल्या दाराशी उभी आहे. मुख्य म्हणजे, काहीलोक चिमुकलीला असे करताना पाहतात मात्र कोणीही यावर काहीच बोलत नाही. कदाचित लोकांना हे दृश्य पाहण्याची आता सवय झाली असावी.

India Becomes World’s 4th Largest Economy, Surpasses Japan ! 🙏 pic.twitter.com/hO2VEK1el4 — Sakshi (@ShadowSakshi) May 27, 2025

कर्माचे भोग इथेच फेडायचेत! तोंडावर खेकसला अन् वृद्ध आजी-आजोबांना बसमधून उतरवलं खाली; कंडक्टरचा संतापजनक Video Viral

दरम्यान घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. व्हिडिओला @ShadowSakshi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याला जबाबदार कोण? केंद्र सरकारची भूमिका काय आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “२०२५ मध्येही असे व्हिडिओ पाहणे वेदनादायक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Poor girl started eating leftover food from plates heart touching video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल
1

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral
2

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral
3

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…
4

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.