(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे आपल्याला थक्क करून सोडतात. इथे प्राण्यांसंबंधित देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी इथे लोक अनेक नवनवीन उपक्रम करताना दिसून येतात. काहीजण स्वतःहून आपल्या अडचणी वाढवून घेतात शेवटी हेच खरे, हेच पटवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात व्यक्तीची मस्ती त्याच्या चांगलेच अंगलड आल्याचे दिसून आले. वास्तविक यात व्यक्ती सिंहाशी मस्ती करताना दिसला मात्र पुढच्याच क्षणी त्याला या मस्तीची मोठी किंमत मोजावी लागते. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयाचा असल्याचे दिसते, जिथे एक भयानक सिंह पिंजऱ्यात आहे. दरम्यान, लाल टी-शर्ट घातलेला एक माणूस सिंहाला स्पर्श करण्यासाठी पिंजऱ्यात हात घालतो जेणेकरून लोक त्याला निर्भय समजतील. पण सिंह त्याचा हा भ्रम क्षणार्धात तोडतो. व्हिडिओमध्ये पुढे असे दिसून येते की सिंह अचानक त्याच्या तीक्ष्ण आणि मजबूत जबड्याने त्या माणसाचे बोट पकडतो, ज्यामुळे तो माणूस वेदनेने ओरडू लागतो.
व्हायरल व्हिडिओ इथेच संपत नाही, व्हिडिओमध्ये असे दिसून येते की तो माणूस सिंहाच्या तोंडातून बोट बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु सिंहासारख्या शक्तिशाली प्राण्यासमोर तो असहाय्य ठरतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळ उभे असलेले लोक हे सर्व हसत हसत पाहत होते आणि कोणीही त्याला मदत करण्यासाठी पुढे आले नाही. तो माणूस आपले बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, शेवटी, सिंहाच्या मजबूत जबड्यांमुळे आणि ओढण्यामुळे, त्या माणसाचे बोट त्याच्या हातापासून वेगळे होते आणि सिंहाच्या पिंजऱ्यात पडते. ही संपूर्ण घटना एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.
हा व्हिडिओ @crazyclipsonly नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, आपल्या आयुष्याला अजिबात महत्त्व देत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निदान तो काहीतरी शिकला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.