Pune Viral Video Pune Woman Puts Leg On Seat, Argues With PMPML Conductor video goes viral
सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही पुण्याचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये कुठे महिलांची भांडणे, तर कुठे पुरुषांची भांडणे, तर कुठे व्हायरल स्टंट असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. शिवाय पुण्यातील लोकांच्या जीवनाचा भाग असलेल्या पीएमपीएमएलचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक पुण्याच्या पीएमपीएमएल मधील अनोखा घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेने बसमध्ये मोठा गोंधळ घातला आहे. महिलेने बसमध्ये डायरेक्ट सीटवर पाय ठेवले आहेत. हे पाहून कंडक्टरने महिलेला पाय खाली घेण्यास सांगितल्यावर तिनो मोठा राडा घातला आहे. तिने कंडक्टरचे न ऐकता त्याच्यासोबत वाद घातला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका पीएमपीएमएल मध्ये महिला सीटवर पाय ठेऊन बसलेली दिसत आहे. बस कंडक्टर तिला पाय खाली घेण्यास सांगतो. यावर ती प्रत्येकाला सांगायचे असे म्हणते. कंडक्टर तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो लोक काय म्हणतील, लोकांना बसायसायला जागा द्या असे सांगत आहे. यावर ती कंडक्टरला स्पष्ट नकार देत मी पाय खाली घेणार नाही असे म्हणते. तरीही कंडक्टर पाय खाली घ्या मावशी असे म्हणत असतो किंवा तिला पुढच्या स्टॉपवर उतरण्यास सांगत असतो. पण तरीही ती ऐकत नाही. तुमच्याही बापाचे काही जात नाही आमच्याही नाही असे म्हणते. कंडक्टर तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती ऐकत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने सीट मोकळी आहे, पाय ठेवला म्हणून काय झाले असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एकाने शी कसली घाणेरडी बाई आहे ती, यक् असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.