भयानक! अजगराने जिवंत माणसाला गिळलं, पोट फडताच जे दिसलं... कमकुवत हृदय असणाऱ्यांनी अजिबात पाहू नका; Video Viral
सोशल मीडियावर तुम्हाला कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे अनेक थरारक आणि आश्चर्यकारक व्हिडिओज शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. अशातच आता इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो तुमच्या अंगाचा थरकाप उडवेल. वास्तविक व्हिडिओमध्ये, एका भल्यामोठ्या अजगराने जिवंत माणसाला गिळंकृत केल्याची भयानक घटना घडून आली आहे. ही घटना इंडोनेशियातील असून यानंतर तेथील लोकांनी अजगराला पकडून त्याचे पोटही फाडू पाहिले पण मग जे दिसलं ते तुमच्या कल्पनेपलीकडंच आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना साउथ बटूनच्या बटुगा जिल्ह्यातील मजापाहित गावात घडली. या शेतकऱ्याचे नाव ६३ वर्षीय ला नोटी असे आहे, जो गुरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. ही घटना ४ जुलै रोजी सकाळी घडल्याचे सांगितले जाते. अहवालात म्हटले आहे की शेतकरी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही, त्यानंतर कुटुंब काळजीत पडले आणि त्यांनी त्याचे शोधकार्य सुरु केले. यादरम्यान, कुटुंबाला त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी आढळली, ज्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली.
Truly horrifying: Man swallowed whole by giant python in Indonesia#python #Indonesia #Horror #Trulyhorrifyinghttps://t.co/U3zv9bjNsH pic.twitter.com/bfLS64jjnO — Ho Thanh Long (@07bcHothanhlong) July 7, 2025
On Saturday, July 5th a 61 Year-old man was found dead after being devoured by a python approximately eight meters long in Indonesia. Clip in tele – https://t.co/N31d49ggSm#indonesiaopen2025 #indonesia pic.twitter.com/p8zD2KSlmR — World In Last 24hrs (@world24x7hr) July 6, 2025
पोलीसच बनले चोर! प्रवाशांच्या थेट खिशात घातला हात अन्…; VIDEO तुफान व्हायरल
बाईक सापडताच, कुटुंबासह गावकऱ्यांनी त्याचा अधिक जोमाने शोध सुरू केला. यातच त्यांना एक आगळावेगळा अजगर आढळून आला, ज्याचे पोट खूप सुजलेले होते आणि अजगर हालू शकत नव्हता. अजगर पाहून गावकऱ्यांना धक्का बसला की अजगराने शेतकऱ्याला गिळंकृत केले आहे. जेव्हा त्यांनी अजगराचे पोट कापले तेव्हा त्यांना त्यात ला नोटीचा मृतदेह आढळला, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. वृत्तानुसार, ला नोटीचा मृतदेह ५ जुलै रोजी इंडोनेशियाच्या वेळेनुसार (WITA) दुपारी २:३० वाजता सापडला. या घटनेचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत ज्यात लोक अजगराला उचलून घेऊन जाताना आणि नंतर त्याचे पोट फेडताना दिसून येत आहे. घटनेचा हा व्हिडिओ @7bcHothanhlong नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.