मरणंही गेलं वाया! अजगराने एकाच वेळी केली दोन बेडकांची शिकार, मग काय... पोट खराब होताच दोघांनाही काढलं तोंडाबाहेर; Video Viral
पावसाळ्यात अनेक वन्य जीव बाहेर पडून शिकारीसाठी सक्रिय होतात. यात सापाचीही समावेश आहे. अजगर हा एक जंगलातील धोकादायक शिकारी आहे जो एका क्षणातच भल्यामोठ्या प्राण्यांना गिळंकृत करतो. त्यातच आता सापाच्या असाच एका शिकरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात त्याने आपली दोन शिकार वाया घालवली. घडलं असं की हव्यासापोटी अजगराने एकाच वेळी दोन बेडकांना खाऊन टाकलं पण अखेर त्याला ती हजम झाली नाही ज्यामुळे दोघांनी त्याला तोंडावाटे बाहेर काढावं लागलं. अजगराचा हा पराक्रम आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. लोक यातील दृश्ये पाहून हैराण झाली असून अजगराने स्वतःच आपल्या शिकाऱ्यांना शरीराबाहेर काढताना पाहून अनेकजण आता अचंबित झाले आहेत.
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका अजगराने दोन मोठे बेडूक गिळंकृत केल्याचे दिसून येते. सापाने प्रथम एक बेडूक गिळंकृत केला आणि नंतर न थांबता दुसऱ्या बेडकालाही गिळंकृत केले. पण लवकरच अजगराला या कृत्याचे परिणाम भोगावे लागले आणि काही वेळाने अजगराची प्रकृती बिघडू लागली. आपली प्रकृती बिघडत आहे हे समजताच अजगराने दोन्ही बेडकांना आपल्या तोंडातून बाहेर काढलं. कदाचित ते दोन्ही बेडूक त्याच्या पोटासाठी खूप जड झाले असतील ज्यामुळे त्याला बेडकांना जिरवता आलं नाही. अखेर अजगराने शिकार करूनही त्याच्या हाती मात्र काहीच लागलं नाही, बेडकांचा जीव गेला आणि त्याने केलेली ही शिकार अखेर वेस्ट ऑफ टाईम ठरली…
पांचट Jokes : तीर्थयात्रेचा विचार पण दारू येतेय आड… मित्राचं हे दुःख वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल
हा व्हायरल व्हिडिओ @cobra_lover_suraj नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “साप इतके लोभी असतात की मला त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साप म्हणत असेल मी माझा विचार बदलला, मला भूक नाहीये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याने पळून जाण्यासाठी उलटी केली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.