(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे. आपल्या कारकिर्दीत सिंह अनेक प्राण्यांची शिकार करतो आणि संपूर्ण जंगलावर आपले वर्चस्व गाजवतो. हा एक असा प्राणी आहे ज्याला पाहून फक्त प्राणीच काय तर माणसंही थरथर कापू लागतात. भलेमोठे शरीर, चेहऱ्यावरील रुबाब आणि बलाढ्य शक्ती या सर्वच गोष्टींमुळे त्याला जंगलाचा राजाची उपमा दिली आहे. आता सिंहाच्या थरारक शिकारीचा अनेक व्हिडिओज याआधीही इंटरनेटवर शेअर आणि व्हायरल आले आहेत पण तुम्ही कधी सिंहाचा शेवटचा व्हिडिओ पाहिला आहे का? असं म्हणतात की मृत्यू जवळ आला की व्यक्तीला आधीच याची चाहूल लागते पण हे प्राण्यांसोबतही घडत का? सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात सिंह आपल्याच मृत्यूसाठी कबर खोदताना दिसून आला. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
पांचट Jokes : तीर्थयात्रेचा विचार पण दारू येतेय आड… मित्राचं हे दुःख वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका मोकळ्या मैदानात एक थकलेला, वृद्ध सिंह दिसून येत आहे. हा तोच सिंह आहे ज्याने आपल्या धैर्याने हजारो शिकाऱ्यांची शिकार केली, हा तोच सिंह आहे ज्याने जंगलावर राज्य केलं, जो कधी पाण्यातील रक्षालाही घाबरला नाही ना त्याने कधी हवेतील पक्ष्यांचे कधी काय चालू दिले. हा तोच आहे ज्याने संपूर्ण जंगल आपल्या मुठीत बंद करून ते संपूर्ण जागाला घाबरवले… पण अखेर त्याचाही शेवट आलाच होता. जीवनाच्या या शेवटच्या क्षणी तो थकलेला, शांत आणि या जगाचा निरोप घेण्यासाठी तयार झालेला दिसून आला. व्हिडिओमध्ये तो जमीन उकरून एक खड्डा बनवत असल्याचे दिसते आणि काहीच सेकंदात त्या खड्यात पडून तो आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास घेतो. त्याच्याकडे बघून त्याला याची आधीच जाणीव झाली असून तो स्वतःसाठी आधीपासूनच कबर खोदत असल्याचे समजते. सिंहाचा हा शेवट आता अनेकांना थक्क करत असून स्वतःच्याच मृत्यूसाठी तो खोदत असलेली ही कबर आणि ही संकल्पनाच खरंतर लोकांना आश्चर्यचकित करत आहे.
तो जातो पण स्वतःच्या शेवट आपल्या पद्धतीने करून जातो. सिंहाचा हा व्हायरल व्हिडिओ @learning_hunger नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे दुर्लभ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटही जंगलातच झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.