Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Raebareli Government Hospital: उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एका गर्भवती महिलेने सरकारी महिला रुग्णालयाच्या गेटबाहेर रस्त्यावर बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 05, 2026 | 04:06 PM
Raebareli Government Hospital: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Raebareli Government Hospital: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयाबाहेर गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार
  • १० हजार रुपयांची मागणी केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
  • महिला आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर
उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला सरकारी महिला रुग्णालयाच्या बाहेरच रस्त्यावर बाळाला जन्म द्यावा लागला. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी प्रसूतीसाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती असा गंभीर आरोप महिलेच्या कुटुंबाने केला आहे. पैसे नसल्यामुळे तिला दाखल करून घेतलं नाही आणि शेवटी तिची प्रसूती दारातच झाली. Raebareli Government Hospital:

पैसे नाहीत तर दाखल नाही, कुटुंबाचा आरोप काय?

मिळालेल्या माहितीनुसार, महिला प्रसूतीच्या वेदनेने तळमळत होती. तिच्या घरच्यांनी तिला घेऊन जिल्हा महिला रुग्णालय गाठलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तपासण्याऐवजी आधी पैशाची मागणी केली असं नातेवाईकांनी सांगितले. कुटुंब खूप गरीब आहे. 10 हजार रुपये देणं त्यांना शक्यच नव्हतं. त्यांनी कर्मचाऱ्यांना हात जोडले, पण त्यांनी ऐकलं नाही.

महिलेला वारंवार बाहेर पाठवण्यात आलं. दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शेवटी वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने रुग्णालयाच्या गेटबाहेरच बाळाला जन्म दिला. रस्त्यावरच तिची डिलिव्हरी झाली. आजूबाजूच्या महिलांनी धावत येऊन तिला मदत केली.

🚨SHOCKING | Pregnant woman forced to give birth outside government hospital in Raebareli after hospital staff demanded ₹10K, which her family could not afford https://t.co/CYV0ByGY3p — The Tatva (@thetatvaindia) October 4, 2026

रुग्णालय प्रशासन म्हणतंय, आम्ही पैसे मागितलेच नाहीत

या प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडाली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत, सगळं उपचार मोफत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. रुग्णालयाच्या अधीक्षक निर्मला साहू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. जर कोणी कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सध्या तरी 10 हजार रुपयांची मागणी झाली होती, हा फक्त कुटुंबीयांचा आरोप आहे, हे सिद्ध झालेलं नाही.

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

सरकारी दवाखान्यांचा हाच खरा चेहरा?

हा काही पहिलाच प्रकार नाही. उत्तर प्रदेशातच नाही तर देशातल्या अनेक सरकारी दवाखान्यांमध्ये असे प्रकार घडत असतात. गरीब लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये या आशेने जातात की तिथे मोफत उपचार मिळेल. पण तिथेही त्यांना पैशासाठी अडवलं जातं.कधी डॉक्टर वेळेवर नसतात, कधी औषधं बाहेरून आणायला सांगतात.

या महिलेच्या बाबतीत तर थेट रस्त्यावर प्रसूती करायची वेळ आली. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. योगी सरकार आरोग्य व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करतं, पण जमिनीवरची परिस्थिती वेगळीच आहे.

आई आणि बाळाची प्रकृती कशी आहे?

या सगळ्या गोंधळानंतर अखेर महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्या महिलेला जो त्रास सहन करावा लागला, तो कधीच विसरता येणार नाही.

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

एका आईसाठी प्रसूतीचा क्षण खूप महत्त्वाचा असतो. त्या वेळी तिला चांगल्या सुविधा मिळायला हव्यात, पण इथे तिला रस्त्यावर बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेने पुन्हा एकदा सरकारी आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत.

Web Title: Raebareli government hospital pregnant woman childbirth outside 10000 allegation rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
1

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
2

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
3

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
4

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.