Jantar Mantar Protest: (फोटो सौजन्य- AI)
दिल्लीतल्या जंतर-मंतरवर रविवारी जे घडलं ते पाहून सगळेच अवाक झाले. आंदोलन सुरु असताना एका माहिलेने आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीची चावी काढली आणि पळून गेली. हे सगळं दृष्ट पोलिस बघतच राहिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.
जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोठं आंदोलन सुरु होतं. आंदोलक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. गर्दी खूप वाढली म्हणून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना बसमध्ये बसवून तिथून घेऊन जाण्याची तयारी सुरु होती.सगळे आंदोलक बसमध्ये बसलेले होते.
पोलीस बस सुरु करणार इतक्यात एक महिला धावत बसजवळ आली. तिने ड्रायव्हरच्या बाजूला हात घातला आणि चावी काढून घेतली. चावी घेतली आणि ती तिथून सटकली. चावी नसल्यामुळे बस एक इंच पण पुढे जाऊ शकली नाही. पोलीस हतबल होऊन बघत बसले.यानंतरचा दुसरा व्हिडीओ तर आणखी भारी आहे. चावी नसल्यामुळे पोलिसांनाच ती मोठी बस ढकलावी लागली. भर उन्हात पोलीस कर्मचारी बसला धक्का देताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. हे दृश्य पाहून लोकांना हसावं की काय करावं तेच कळत नव्हतं. Jantar Mantar Protest:
हा व्हिडीओ समोर येताच लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. काही लोक म्हणत आहेत की महिलेने जे केलं ते एकदम धाडसी होतं. तिने आयडिया लढवून पोलिसांचा डाव फसवला. आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी तिने हे केलं असं अनेकांचं म्हणणं आहे.
पण दुसरीकडे काही लोक म्हणत आहेत की हे चुकीचं आहे. सरकारी गाडीची चावी घेऊन पळणं हा गुन्हा होऊ शकतो. यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तिच्यावर केस होऊ शकते अशी पण चर्चा आहे.
रविवारी जंतर-मंतरवर मोठी गर्दी जमली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन होतं. तिथे खूप मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.पोलिसांनी सांगितलं की आंदोलन शांततेत सुरु होतं, पण नंतर परिस्थिती बिघडली. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला तेव्हा झटापट झाली. या झटापटीत दिल्ली पोलिसांचे 15 जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.एकंदरीत वातावरण खूप तणावाचं झालं होतं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वाद झाले.
So, this is the girl who took the bus key and ran. 😹😹😹 https://t.co/o32rTCQ9t1 — زماں (@Delhiite_) October 4, 2026
A young female agitator today in New Delhi ran away with the ignition key of a bus in which detained protestors were being shipped off. Later the police sleuths had to push the bus to remove it from the protest site. https://t.co/yLaEWGwUt7 — Saurabh Sharma (@saurabhsherry) October 4, 2026
सध्या त्या महिलेचा शोध सुरु आहे का याबद्दल अजून माहिती आलेली नाही. पण तिने चावी चोरून नेल्याचा व्हिडीओ हा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.या एका घटनेमुळे जंतर-मंतरवरच्या आंदोलनाला वेगळंच वळण मिळालं आहे. लोक आंदोलनाच्या मागणीपेक्षा त्या महिलेच्या चावी चोरण्याच्या चर्चेत जास्त रस घेत आहेत.
दिल्ली पोलिसांसाठी पण ही थोडी लाजिरवाणी गोष्ट झाली आहे. भर गर्दीतून एक महिला येते आणि बसची चावी घेऊन जाते आणि पोलीस काहीच करू शकत नाहीत.बघूया आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात आणि त्या महिलेला पकडतात का.






