रिअल लाइफ घोस्ट रायडर! तरुणाने अंगाला आग लावत केला धोकादायक स्टंट; भयानक दृश्ये पाहून थरकाप उडेल; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी वन्य प्राण्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात तर कधी धक्कादायक घटना. आपल्याला व्हायरल करण्यासाठी लोक इंटरनेटवर अनेक नवनवीन प्रकार करू पाहतात. आताही एका तरुणाने असेच काहीतरी करू पाहिले आहे. यात तो स्वतःच्या अंगाला आग लावत बाईकयावर राइड करताना दिसतो. त्याचा हा भयानक स्टंट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील थरारक दृश्ये पाहून आता युजर्सचा थरकाप उडाला आहे. यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
बाईक स्टंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्याने व्हायरल क्लिपमध्ये जे काही पाहिले ते खरोखर खरे आहे की हॉलीवूड चित्रपटातील दृश्य आहे का असा प्रश्न नेटिझन्सना पडला आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये एका बाइकरला खऱ्या आयुष्यातील ‘घोस्ट रायडर’ दाखवण्यात आले आहे. होय, तोच काल्पनिक अमेरिकन सुपरहिरो, ज्याला तुम्ही मार्वल युनिव्हर्स चित्रपट ‘घोस्ट रायडर’ मध्ये पाहिले असेल. हा सुपरहिरो घोस्ट रायडर बनून, त्याच्या ज्वलंत मोटरसायकलवर स्वार होऊन आणि जगाला हानी पोहोचवणाऱ्या दुष्ट आत्म्यांना जाळून टाकून दुष्ट आत्म्यांचा बदला घेतो. आता हे काल्पनिक दृश्य सत्यात उतरताना दिसून आले आहे.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ‘घोस्ट रायडर’च्या गेटअपमध्ये एक व्यक्ती बाइक चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर ही बाईक घोस्ट रायडरच्या कारशी हुबेहुब मिळते. दुचाकीस्वाराने घोस्ट रायडरप्रमाणे शरीराला साखळी बांधली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे दुचाकीस्वाराला डोक्यापासून मागच्या बाजूला आगीच्या ज्वाळांनी घेरले आहे. हा व्हिडिओ केवळ रोमांचकच नाही तर अत्यंत धक्कादायकही आहे. कारण, वास्तविक जीवनात, एखाद्याला ‘घोस्ट रायडर’ गेटअपमध्ये पाहणे आणि अशा आगीच्या ज्वाळांमध्ये वेढलेले पाहणे लोकांसाठी खरोखरच आश्चर्यकारक अनुभव असू शकतो. रस्त्याने चालत असताना अचानक असा दुचाकीस्वार दिसला तर कोणीही घाबरून जाईल हे उघड आहे.
A ghost rider 🔥 pic.twitter.com/lOrz7kOIe8
— DamnThatsInteresting (@DamnThatsInter) February 25, 2025
दरम्यान याचा व्हायरल व्हिडिओ @DamnThatsInter नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, एक गोस्ट रायडर’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हिवाळ्यासाठी एक उत्तम पर्याय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” हुबेहूब तसाच वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.