(फोटो सौजन्य: Twitter)
काही दिवसांपूर्वीच महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला. भगवान शिवाला समर्पित हा दिवस एक भक्तिमय दिवस मानला जातो. यानिमित्त लोक भगवान शिवाची पूजा-अर्चा, उपवास करत शिवमंदिरांना भेट देतात. यानिमित्तच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये आता अनेकांना आश्चर्यचकित करत आहेत. यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
भक्ती ही कुणीही, कशीही आणि कधीही करू शकतो, देवाच्या दारी सर्वच सामान. आजवर तुम्ही अनेकांना भक्तीत लिन होताना पाहिले असेल मात्र तुम्ही कधी प्राण्यांचा देवाची भक्ती करताना पाहिले आहे का? नसेल तर आता तुम्हाला ते पाहता येईल. नुकताच सोशल मीडियावर एका बैलाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे ज्यात तो भगवान शंकराच्या मंदिरासमोर नतमस्तक होताना दिसून आला. बैलाचे हे अप्रतिम वागणे पाहून जणू तो भोलेनाथाला वंदन करत आहे असे वाटते. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना सुखद धक्का मिळाला आहे. बैलाची ही कृती अनेकांना भाळली असून लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
मानव आणखीन किती क्रूर होणार? श्वानाला भरलं पोत्यात अन्… माणुसकीला काळिमा फासणारा Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात काळ्या रंगाचा बैल मंदिराबाहेर उभा असून त्याचे पुढचे पाय दुमडले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर त्याचे मस्तक देखील पूर्णपणे झुकलेले आहे, जणू तो भगवान शिवाच्या चरणी नमस्कार करत आहे. आपली मन मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून तो निरागस नजरेने मंदिरातील मूर्तीकडे पाहू लागतो. हे दृश्य इतकं अनोखं होतं की जो कोणी पाहिलं तो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
Nandi ji bowing at the feet of the Lord.
Hearty congratulations and best wishes to all the countrymen on the sacred festival of Mahashivratri.#HappyMahaShivaratri #Mahashivratri2025 🙏🏻
🕉️🐚🔱🙏🏻🙏🏻🔱🐚🕉️🚩 pic.twitter.com/Lm0pt37s83— सतीश राजपूत #कैरू (मोदी का परिवार) (@StanwarSatish) February 26, 2025
बैलाचा हा सुंदर व्हिडिओ @StanwarSatish नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘नंदी जी भगवंताच्या चरणी नतमस्तक’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “भगवान शिवाला नमस्कार करताना नंदी बाबा अतिशय अप्रतिम दिसत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक नंदीसुद्धा महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करत आहे. महादेवाचा महिमा अपार आहे तिथे माणसांशिवाय नंदीही दर्शनाला येतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.