Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 

Marriage In Hospital : मेकअपसाठी गेलेला वधूचा वाटेतच भयंकर अपघात घडला, पण खचून न जाता वराने आणि त्याच्या कुटुंबाने वधूच्या कुटुंबाला धीर दिला आणि हॉस्पिटलमध्ये लग्नाचा घाट घातला. 

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 22, 2025 | 05:41 PM
एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 

Follow Us
Close
Follow Us:
  • वधूचा गंभीर अपघात झाल्यामुळे कोच्चीतील वीपीएस लेकशोर रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागातच विवाह सोहळा पार पडला.
  • ठरलेल्या दिवशीच लग्न व्हावे या दोन्ही कुटुंबांच्या आग्रहामुळे रुग्णालय प्रशासनाने परवानगी देऊन सोहळ्याची साध्या वातावरणात व्यवस्था केली.
  • वधूच्या पाठीच्या कण्यात गंभीर दुखापत असून तिची प्रकृती स्थिर आहे, पण शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे.
‘विवाह’ चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर यातील शेवटचा सीन नक्कीच तुमच्या स्मरणात असेल. यात हिरोने हिरोइनच्या अपघातानंतरही तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये लग्न केलं आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. काही असाच प्रकार आता सत्यात घडून आला आहे. कोच्चीतील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी एक विलक्षण घटना घडली, इथे एक विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या काही तास आधीच वधूचा अपघात झाला होता आणि तिला गंभीर दुखापत झाली होती. तरीही दोन्ही कुटुंबांनी ठरलेल्या दिवशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णालयालाच विवाहस्थळ बनवले. कठीण प्रसंगातही दोन्ही परिवारांनी धैर्य राखून या लग्नाची पूर्णता केली. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगला चर्चित ठरला आहे.

छोटुसा फ्रॉक, गळ्यात घातला नेकलेस अन् डोक्यावर फुलांचा गजरा… प्रेग्नंट डॉगीसाठी मालकाने केलं क्युट बेबी शॉवर, Video Viral

रुग्णालयातील साध्या वातावरणात झाले लग्न कोच्ची येथील वीपीएस लेकशोर रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात हा सोहळा झाला. कुठलीही सजावट नव्हती, गोंधळ नव्हता फक्त डॉक्टर, नर्सेस आणि काही जवळचे नातेवाईक एवढीच उपस्थिती. शाळेत शिकवत असणाऱ्या वधूने आणि इंजिनिअरिंग कॉलेजात प्राध्यापक असलेल्या वराने परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी एकमेकांचा आधार बनण्याची प्रतिज्ञा केली. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, वधूसाठी हा दिवस आयुष्यातील विशेष होता आणि अपघातही याच दिवशी झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची इच्छा मान्य करून रुग्णालयाने इमर्जन्सी विभागातच लग्नाला परवानगी दिली.

अजब लग्नाची गजब कहाणी! लग्नात मनसोक्त नाचली अन् संधी भेटताच वराला सोडून भरमंडपातून गायब झाली नवरी; Video Viral

शुक्रवारी दुपारी लग्न होणार होते. पण पहाटे तीनच्या सुमारास वधू मेकअपसाठी जात असताना गाडी चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन झाडाला धडकले. जखमींना प्रथम कोट्टयम मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र वधूच्या पाठीच्या कण्यात गंभीर दुखापत असल्याने तिला जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या लेकशोर रुग्णालयात हलवावे लागले. अपघाताची बातमी मिळताच वर आणि त्यांचे कुटुंब तात्काळ रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी डॉक्टरांशी चर्चा करून ठरल्याप्रमाणे याच दिवशी लग्न करण्याची विनंती केली आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या सोयीनुसार व्यवस्था केली.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Real life vivah moment after the bride accident groom arranged wedding ceremony in hospital viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Hospital
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

अजब लग्नाची गजब कहाणी! लग्नात मनसोक्त नाचली अन् संधी भेटताच वराला सोडून भरमंडपातून गायब झाली नवरी; Video Viral
1

अजब लग्नाची गजब कहाणी! लग्नात मनसोक्त नाचली अन् संधी भेटताच वराला सोडून भरमंडपातून गायब झाली नवरी; Video Viral

छोटुसा फ्रॉक, गळ्यात घातला नेकलेस अन् डोक्यावर फुलांचा गजरा… प्रेग्नंट डॉगीसाठी मालकाने केलं क्युट बेबी शॉवर, Video Viral
2

छोटुसा फ्रॉक, गळ्यात घातला नेकलेस अन् डोक्यावर फुलांचा गजरा… प्रेग्नंट डॉगीसाठी मालकाने केलं क्युट बेबी शॉवर, Video Viral

किडेबाजी नडली! कारच्या छतावर डान्स करण्याचा तरुणांचा स्टंट; चालकाने ब्रेक मारताच हवेत उडाले अन्…, भयावह VIDEO VIRAL
3

किडेबाजी नडली! कारच्या छतावर डान्स करण्याचा तरुणांचा स्टंट; चालकाने ब्रेक मारताच हवेत उडाले अन्…, भयावह VIDEO VIRAL

‘Tejas’ क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की…, VIDEO
4

‘Tejas’ क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की…, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.