Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकाकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप नवी मुंबईत समोर आला आहे. सीबीडी बेलापूर वाहतूक शाखेतील एएसआय रमेश पवार यांच्याशी संबंधित कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत त्यांना निलंबित केलं. नेमकं प्रकरण काय?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 20, 2026 | 03:47 PM
ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

Follow Us
Follow Us:
  • ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप
  • व्हायरल व्हिडिओची उपायुक्तांकडून दखल
  • एएसआय रमेश पवार निलंबित
 

नवी मुंबई : ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सीबीडी बेलापूर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) रमेश पवार यांच्यावर करण्यात आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीनंतर रमेश पवार यांना निलंबित करण्यात आलं असून, पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात होती. यावेळी एक कारचालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळल्याचं सांगण्यात येत आहे. नियमानुसार संबंधित चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र, ही कारवाई टाळण्यासाठी एएसआय रमेश पवार यांनी चालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आलं.

हेही वाचा: कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

व्हिडिओ व्हायरल होताच वरिष्ठांची कारवाई

या घटनेची दखल घेत वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत गंभीर स्वरूपाची कसूर आढळल्याने रमेश पवार यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खारघर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. चौकशीतून या कथित प्रकाराबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

गैरप्रकारांबाबत वाहतूक विभागाची कठोर भूमिका

या कारवाईबाबत बोलताना डॉ. राहुल खाडे यांनी सांगितलं की, संबंधित कर्मचाऱ्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का लागू नये, हा या कारवाईमागील उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीचे नियम लागू करण्यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. पुढील चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एएसआय रमेश पवार यांना निलंबित का करण्यात आलं?

    Ans: ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं.

  • Que: व्हायरल व्हिडिओनंतर काय कारवाई झाली?

    Ans: वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित एएसआयला निलंबित करण्यात आलं.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडल्याची माहिती आहे.

Web Title: Navi mumbai asi ramesh pawar suspended bribe allegation sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • drink and drive
  • Navi Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’
1

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या
2

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’
3

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

Navi Mumbai News: घणसोली एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
4

Navi Mumbai News: घणसोली एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.