
Republic Day Parade Practice 2026
या कडाक्याच्या थंडीत आणि जोरदार पावसातही जवानांची संचलन सराव सुरुच होता. जवानांनी आल्लाहदायक वातावरणात परडे केली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच दिल्लीत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच कडाक्याची थंडीही पडली आहे. लोक घराबाहेर पडण्यास कचरत आहेत. पण दुसरीकडे जवानांची शिस्त आणि समर्पणाची भावना पाहायला मिळत आहे. कडक शिस्त, अंगावर काटा आणणारे संचालन आणि देशाप्रती प्रेम हे भारतीय जवानांचे वैशिष्ट्ये आहेच. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल व्हिडिओ
#WATCH दिल्ली: कर्तव्य पथ पर गणतंत्र दिवस परेड की फुल-ड्रेस रिहर्सल की गई। pic.twitter.com/MUi1zaCOge — ANI_HindiNews (@AHindinews) January 23, 2026
या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी जवानांचा उत्साह पाहून त्यांना सलाम केला आहे. घरी असो किंवा सीमेवर आपल्या देशाची सेवा करायला भारतीय जवान नेहमीच तयार असतात हे यातून स्पष्ट होते. अनेकजण जवानांचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओच्या काही दिवसांपूर्वीच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जवानांमध्ये सरावानंतरही उत्साह पाहयाला मिळाला. सर्व जवान क्रिश चित्रपटातील गाणे उत्साहाने गात होते. हा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.