(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दोन मद्यधुंद मच्छीमार पाण्यात तरंगणाऱ्या मृत व्हेल माशावर चढल्याचे दिसून येत आहे. असा दावा केला जात आहे की दोन्ही मद्यधुंद पुरुष हसताना आणि मृत व्हेल माशाच्या शरीरासोबत फोटो काढताना दिसले. घटनेचे ठिकाण आणि वेळ अस्पष्ट आहे आणि व्हिडिओची सत्यता पुष्टी झालेली नाही. व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीने मान्य केले की तो गट मद्यधुंद होता आणि दावा केला की व्हेलचा नुकताच मृत्यू झाला होता त्याचे शरीर सडलेले नव्हते, ना त्यातून कोणता वास येत होता. यूजर्स आता मद्यपींच्या या वर्तनावर चांगलेच नाराज असून आपण निसर्गाचा थोडा तरी आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत.
NEW: Two drunk fishermen pose for a photo on a floating dead whale. “These guys are going to jump on a dead whale… watch this thing explode.” The individual who shared the footage said the whale didn’t smell and indicated that it had just passed. “Wasn’t rotten, just… pic.twitter.com/mjIYde4g4l — Collin Rugg (@CollinRugg) January 19, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @CollinRugg नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खरं वाटत नाहीये. एवढा मोठा मासा असू शकतो यावर विश्वास बसत नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फक्त बेपर्वा आणि घृणास्पद आहे. मद्यधुंद असणे हे निमित्त नाही, एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चुकीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या स्टंटबाजीला नव्हे तर निसर्गाला आदर मिळायला हवा, याची आठवण करून देणारा एक बेपर्वा क्षण व्हायरल झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






