भारतीय जवानांचा हटके अंदाज ! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्य पथकावर जोरदार तयारी सुरु आहे. भारतीय जवाना उत्साहात संचालनाची तयारी करत आहेत. कडक शिस्त, अंगावर काटा आणणारे संचालन आणि देशाप्रती प्रेम हे भारतीय जवानांचे वैशिष्ट्ये नेहमीच पाहायला मिळते. पण यावेळी भारती जवनांचा एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय जवान हिंदी चित्रपट क्रिश मधील दिल ना दिया गाणे गाताना दिसत आहेत.
कडाक्याच्या थंडीत आणि सततच्या सरावानंतरही दरम्यान भारतीय जवनांचा हा उत्साह पाहायला मिळत आहे. यावरुन एक लक्षात येते की सीमेवर, ड्युटीवर जवान सतर्क असतातच, पण त्यांच्या अंगात एक कलाकारही दडलेला असतो. हा व्हिडिओ अनेकंच्या पसंतील पडत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Kiris ka sunega Gana..Le bete 😎 INDIAN Army personnel warm up ahead of the Republic Day parade rehearsal. pic.twitter.com/OmtDN27kOm — TRIDENT (@TridentxIN) January 20, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TridentxIN या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने भारतीय जवानांना सलाम अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने भारतीय जवानांचा स्वॅगच काही और आहे असे म्हटले आहे, तर एकाने क्रिशचे गाणं दिल्लीपर्यंत पोहचले का? असा प्रश्न केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये Kiris Ka Gana Sunega असे लिहिले आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






