म्हशींच्या कळपाला पाहताच जंगलाचा राजा झाला गपगार, बेशुद्ध पडत झोपेचे केले नाटक पण तरीही झाली धु धु धुलाई; Video Viral
सोशल मीडियावर आजतागत प्राण्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. यात आपल्याला अनेक अनोखे दृश्य पाहायला मिळते जे पाहून लोक थक्क होतात. असे हे व्हिडिओज नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होतात. अशात आता इथे जंगलाच्या राजाशी संबंधित आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हे व्हिडिओ काहीसा वेगळा आहे यात राजा कोणत्या प्राण्याची शिकार करत नसून राजाची शिकार होत असल्याचे दृश्ये दिसून आले. नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
सध्या सोशल मीडियावर एक मनोरंजक आणि आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सिंह रान म्हशींच्या कळपातून पळून जाण्यासाठी बेशुद्ध झाल्याचे नाटक करत आहे. सिंह जंगलात विश्रांती घेत असताना म्हशींचा कळप तेथे येतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सिंहाला म्हशींचा कळप दिसताच तो घाबरतो आणि बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागतो. सिंहाचे हे घाबरलेले रूप पाहून आता सोशल मीडिया युजर्स अचंबित झाले आहेत. पण व्हिडिओत दिसते की सिंहाची ही युक्ती काही त्याच्या कामी येत नाही आणि तो शेवटी म्हशींच्या कळपाद्वारे धु धु धुतला जातो. हे अनोखे दृश्य आता अनेकांना आश्चर्यचकित करत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक म्हैस प्रथम सिंहापर्यंत पोहोचते आणि त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, परंतु सिंह गप्प राहतो. यानंतर, दुसरी म्हैस आपल्या शिंगाने सिंहाला मारते, परंतु सिंह अजूनही बेशुद्ध झाल्याचे नाटक करतो. पण मग सर्वात चिडलेली म्हैस कळपातून बाहेर येते आणि सिंहाला हवेत फेकते. सिंहाला हवेत फेकल्याने म्हशींचा कळप त्याच्यावर हल्ला करू लागतो आणि सिंह पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला चारी बाजूंनी घेरले जाते. सिंह आणि म्हैस यांच्यातील ही विचित्र लढत पाहून सोशल मीडियावरील चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. जंगलाचा राजा मानला जाणारा सिंह कधी कधी आपला जीव वाचवण्यासाठी अनपेक्षित चाली करतो हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओ सिंह आणि म्हैस यांच्यातील शक्तीची खरी लढाई अतिशय मनोरंजक पद्धतीने या व्हिडिओत दिसून येते जे पाहणे फार मनोरंजक ठरते.
हा व्हायरल व्हिडिओ @Latestsightings नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘म्हशींनी नाटक करत असलेल्या सिंहली पायदळी तुडवले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असे वाटत आहे क, सिंहाने आपल्या आयुष्यात जितक्या म्हशी मारल्या त्या सर्वांची भुते परत येऊन त्याचा सूड घेत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जरी वेळ जास्त लागला असला तरी अखेर म्हशींना न्याय मिळाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.