(फोटो सौजन्य: instagram)
अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे व्हिडिओ अनेकदा लोकांना आश्चर्यचकित करतात. अनेकदा इंटरनेटवर असेही काही व्हिडिओ शेअर होतात ज्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा दातांनी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात विटा उचलताना दिसला. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण ज्या विटा आपल्याला हातांनी उचलणे कठीण होते त्याच विटा हा मुलगा आपल्या दातांनी उचलताना दिसून आला.
तुम्ही आजवर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहिले असतील. स्वतःला व्हायरल करण्यासाठी अनेकदा लोक नको ते पराक्रम करू पाहतात. मात्र सध्याचा चिमुकल्याचा हा पराक्रम काही साधा-सुधा नाही. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक आता त्याची ताकदीची प्रशंसा करत आहेत. यात नक्की काय आणि कसे घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक मुलगा हाताने नाही तर दातांनी 7 विटा उचलताना दिसतो. साधारणपणे 4-5 विटा हाताने उचलणे खूप जड असते. अशात या मुलाने दातांनी सात विटा तर उचलल्याच पण त्या दातात पकडत त्याने जागेवरून उचलत आपल्या तोंडापुढे पकडल्या. विटांचा हा थर इतका मोठा असतो की व्हिडिओत तुम्हाला मुलाचे तोंड यामागे झाकल्याचे दिसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहणाऱ्या लोकांसाठी मोठा सरप्राईज ठरला. मुलाचे हे अद्भुत कौशल्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओने सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरू केली आहे, जिथे लोक त्या मुलाच्या ताकद आणि कौशल्याबद्दल बोलत आहेत.
चिमुकल्याचा हा व्हिडिओ @shree_ram_faimly नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स करत मुलाच्या या पराक्रमावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सुपर टॅलेंट” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे अशाने दात तुटतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.