
shocking mother keeps baby in scooter dicky video goes viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला घरातून बाहेर येत आहे. तिच्या हातात एक लहान बाळ आहे. महिला स्कूटीजवळ गेल्यावर डिक्की ओपन करुन थेट त्यात ठेवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला बाळाला डिक्कीत झोपवून सीट बंद करते आणि कोणत्याही भीतीशिवाय स्कूटी चालवून निघून जाते. सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्कूटीच्या नंबर प्लेट MP पासिंगची आहे. यामुळे ही घटना मध्यप्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे स्पष्ट नाही.
व्हायरल व्हिडिओ
देश में रीलबाजी का नशा अगर ऐसे ही बढ़ता रहा तो वो दिन दूर नहीं जब सरकार को “रील मुक्त भारत अभियान” चलाना पड़ेगा। pic.twitter.com/rEvOhxORTY — NCIB Headquarters (@NCIBHQ) March 14, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @NCIBHQ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सर्व प्रकार रिलसाठी केला असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी संबंधित महिलेविरोधात आणि व्हिडिओ काढणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. महिलेच्या या धक्कादायक कृत्यामुळे बाळ गुदमरून मरण्याचीही शक्यता आहे. या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, अशी परिस्थिती राहली तर सरकारला रीलचा नशा उतरवण्यासाठी रील मुक्त अभियान सुरु करावे लागणार आहे असे म्हटले आहे.
दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव, शेख सराईतील इमारत आगीत जळून खाक; भीषण घटनेचा Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.