धक्कादायक! भररस्त्यात धावत्या रिक्षाला लागली आग, थरकाप उडवणारी दृश्ये अन् संभाजीनगरचा Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला भावुक करून जातात. यात बऱ्याचदा काही धक्कादायक व्हिडिओ देखील सामील असतात, ज्यांना पाहून आपला थरकाप होऊ लागतो. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात भररस्त्यात एका धावत्या रिक्षाला आग लागल्याचे दिसून येत आहे. ही घटना संभाजीनगरमधली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रस्त्यावर एकच खळबळ उडाली. व्हिडिओतील दृश्ये थरकाप उडवणारी आहेत.
सध्या दिवाळी सुरु आहे, ज्यामुळे जागोजागी फटाके फोडले जातात. लोक फटाके फोडून या सणाचा आनंद लुटतात. मात्र सणाचा आनंद लुटताना आपली आणि इतरांची खबरदारी घेणे फार गरजेचे असते अन्यथा आपली मजा कोणाच्या जीवावर देखील बेतू शकते. काही लोक निष्काळजीपणे वाहनांसमोर किंवा चालू रस्त्यावर फटाके फोडतात ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. सध्या असाच काहीसा प्रकार घडून आल्याचे दिसून आले आहे.
हेदेखील वाचा – बापरे! तरुणाने महाकाय कोब्राचे घेतले चुंबन तेवढ्यात सापाने काढला फणा अन् क्षणार्धात… थरकाप उडवणारा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका रिक्षाने भररस्त्यावर पेट घेतला आहे. यात तुम्हाला दिसेल की, अचानक रिक्षाने पेट घेतल्याने रस्त्यावरची सर्व मंडळी घाबरली आणि तिथे लोकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. यानंतर सुदैवाने लोकांनी एकजुटीने रिक्षावर पाणी टाकून ही आग आटोक्यात आणली. माहितीनुसार, हा व्हिडीओ संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस परिसरातील आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण या आगीमुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
हेदेखील वाचा – पोलिसांचाही धाक राहिला नाही! भांडण सोडवायला आलेल्या पोलिसाला लोकांनी जोरदार हाणले, धक्कादायक Video Viral
रिक्षा अपघाताचा हा व्हायरल व्हिडिओ @sambhajinagar_portfolio नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कॅनॉट प्लेस’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 1.5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दिवाळीत एकही अपघात नाही असे कधी घडेल का? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दिल्लीचा व्हिडिओ आहे हा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नक्की काय झाले तिथे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.