shocking viral video Parents had to pay dearly for leaving toddler alone at home Child fall down from balcony video goes viral
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्यासोबत थरारक प्रसंग घडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक लाहन मुलगा घराच्या बाल्कनीच्या खिडकीत अडकलेला दिसत आहे. काही लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, काही काळासाठी चिमुकल्याचे पालक घराबाहेर गेले होते. त्यांनी चिमुकल्याला घरातच ठेवून लॉक लावले होते.
याचदरम्यान चिमुकला खेळता खेळता बाल्कनीत आला. यावेळी बाल्कनीच्या खिडकीत तो उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. खिडकीतून बाहेर वाकून पाहताना अचानक चिमुकल्याचा तोल गेला आणि तो खिडकीत अडकला. त्याचा त्याचे डोके खिडकीत अडकले नसते तर मोठा गंभीर अपघात जाला असता. चिमुकल्याचे डोकं अडकल्यानं तो तिछेट लटकून राहिला. नाहीतर चिमुकल्याचा जीवही गेला असता. मात्र, हे पाहताच घराखाली असलेल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि सुदैवाने त्वरित मदत मिळाल्याने लोकांना चिमुकल्याला वाचणवण्यात यश आले. पण अनेकदा लहान मुलांकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी कधी कोणता वाई प्रसंग ओढावेल सांगणे कठीण आहे. लहान मुले कधी, कुठे काय मस्ती करतील सांगता येत नाही. यामुळे त्यांची काळजी घेताना पालकांना अगदी सावधगिरी बाळगावी लागते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @its_prakash_kalawat या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी अशा घटनांमध्ये वाढ झाली असून चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांनी पालकांनी मुलांना एकटे सोडताना अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत अन्यथा अशा घटना जीवघेण्या ठरू शकतात. हा व्हिडिओ पालकांसाठी एक धडा आहे. मुलांनी घरी एकटं न सोडण्याचा, तसेच खिडकी, बाल्कनींना सुरक्षित करण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.