जंगलाच्या राजाशी मस्ती करणं आलं तरुणाच्या आंगलट; सिंहाच्या जबड्यात असा अडकला की, Video Viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळातात. स्टंट, जुगाड, भांडण यांच्या शिवाय अनेक प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाला जंगालाच्या राजाला सिंहाला डिवचणं चागलंच महागात पडलं आहे.
खरं तर एखादा प्राणी हिंसक असला तरी कोणत्याही कारणाशिवाय किंवा त्याला त्रास दिल्याशिवाय हल्ला करत नाही. पण अनेकदा काही माणसे अतिशय खोडकर असतात, अनेकदा त्यांना आपण कोणाची छेडं काढत आहोत हे कळत नाही. लोकांना अनेकदा अशी मस्ती करणं, खोडकरपणा चांगलाच आंगलट येतो. असे काहीसे या व्हिडिओतील तरुणासोबत घडले आहे. त्याने सिंहाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, पण ही मस्ती त्यालाच आंगलट आली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहून शकता की, एका प्राणीसंग्रहालयाचा परिसर दिसत आहे. अनेक लोक प्राणीसंग्रहलयात आले आहेत. याच वेळी तिथे एका सिंहाला देखील पिंजऱ्यात बंद केले आहे. दरम्यान एक तरुण सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जातो. तरुण पिंजऱ्याच्या जाळीतून सिंहाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न करत असतो. सिंह त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र पिंजऱ्यामुळे ते शक्य होत नाही. तो तरुण मोठ्या मोठ्या हसत टाळी वाजवत असतो. तो पुन्हा दोन वेळा सिंहाला डिवचतो. याच वेळी त्याचे लक्ष नसताना सिंह तरुणाच्या हातीची बोटे जबड्यात धरतो. तरुण आपली बोटं सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण सिंहाची पकड खूप मजबूत असते. तो तरुणाच्या बोटाला चावा घेतो. हे सर्व दृश्य प्राणीसंग्रहालयात आलेल्या लोकांनी त्यांच्या फोनच्या कॅमेरात कैद केले आहे. यादरम्यानव कोणीही तरुणाच्या मदतीस पुढे येते नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Man learns the hard way to not taunt a lion pic.twitter.com/TJKdSoeq73
— Crazy Clips (@crazyclipsonly) October 20, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायररल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @crazyclipsonly या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देत तरुणाला चांगलीच शिक्षा मिळाली असे म्हटले आहे. एका युजरने जंगालाचा राजा हा राजाच असतो, मग तो कुठेही असो असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने बेटा अशी मस्ती करायला जायचेच नाही ना असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.