अति घाई संकटात नेई! घाईत रस्ता ओलांडायला गेली तरुणी इतक्यात...; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात अपघांताचे प्रमाण वाढले असून याचे थरारक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अनेकदा वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्ता ओलांडताना काळजी न घेणे यामुळे अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाढत्या रहदारीमुळे तर रस्ता पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना काळजी घेणं अत्यंत महत्वाचे आहे. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीला रस्ता ओलांडताना घाई करणे महागात पडले आहे. यामुळे तिला एक वाहनाची जडोरदार धडक लागून तिचा अपघात झाला आहे. व्हायरल होत असेलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्ता ओलांडत आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु आहे. याचवेळी रस्ता ओलांडत असताना तरुणी एका तरुणाचा हात धरुन रस्ता ओलांडत असते. मात्र, ती घाई करत, रस्ता ओलांडण्यासाठी पळत सुटते. याचवेळी एका बाजूने जोरदार वेगात एक चारचाकी येत असते. या चारचाकीची धडक तिला बसते. तिला धडक बसताच ती जोरदार उडून पडते. यानंतर ती पटकन उठून जाऊन एका ठिकाणी बसते. तिला नक्कीच जोरात लागले असणार आहे. पुढे काय झाले याबाबत अद्याप कोणती माहिती मिळाली नाही. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @deni.antonius.3 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, दिदी घाई कशाला करायची, तर दुसऱ्या एका युजरने तिच्या बाजून जाणाऱ्या तरुणावर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, त्या तरुणाने पोरीला लागलं नाही लागलं काहीच बघितले नाही, तसाच निघून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही गोष्टीसाठी घाई करु नये, अति घाई संकटात नेई हे लक्षात घेण्यासारखे आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.