
shocking viral video teacher teaching wrong spelling to students
छत्तीसगढच्या बलरामपूर येथील, सरकारी शाळेतील शिक्षकाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान देत आहे. शिक्षकांना साधे सोप्पे स्पेलिंग्स देखील येत नाही. त्यांनी Eye चे स्पेलिंग Iey लिहिले आहे, तर Nose चे स्पेलिंग Noge आणि Ear चे स्पेलिंग Eare लिहिले आहे. विद्यार्थ्यांना हे स्पेलिंग तो त्याच्या मागे म्हणालयला लावत आहे. Iey म्हणजे डोळे, Noge म्हणजे नाक, आणि Eare म्हणजे कान असे शिकवत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चक्रावले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @thelogicalindian या अकाउंटवर शेअर केला आहे. याव्हिडिओवर अनेकांनी मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष करुन पालकांनी शिक्षक असे असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य कसे सुधारेल असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने , जेव्हा तुम्ही ७० गुण मिळवणाऱ्या ऐवजी २० गुण मिळवणाऱ्या शिक्षकाला ठेवता, तेव्हा काय अपेक्षा कराल? असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने जेव्हा आरक्षणातून नोकरी मिळाली की असाच परिणाम होणार असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने, शिक्षकाच्या भाषेत, Isne Noge Katva Di असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.