
Shocking Viral Video
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही काळात महिलांसोबतच्या गैरवर्तनाचे अनेक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. जगभरातून महिलांच्या शोषणाच्या, त्यांच्यावर हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. सध्या भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
श्रीलंकेत एकट्या राहणाऱ्या विदेशी महिलेसोबत घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला न्यूझीलंडची रहिवासी आहे. ती श्रीलंकेतमध्ये पर्यटनासाठी आलाी होती. यावेळी तिने भाड्याने टुक-टुक घेऊन त्यातून प्रवास केला. यावेळी तिला एक त्रासदायक अनुभव आला. या घटनेमुळे जागतिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विदेशी महिला टुक-टुक मधून फिरडत आहे. यावेळी एका ठिकाणी ती काही काळासाठी थांबते. तेव्हा एक तरुण स्कूटरवर तिच्याजवळ येतो आणि तिच्याशी बोलू लागतो. महिलेला देखील सुरुवातीला काही चुकीचे वाटत नाही यामुळे ती त्याच्याशी गप्पा मारु लागते. पण अचान तरुण असे काही करतो की महिलेला अस्वस्थ वाटू लागते. पुरुष तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बोलतो. धक्कादायक म्हणजे तरुण पॅन्ट काढून तिच्यासमोर अश्लील वर्तनही करोत. यामुळे घाबरलेली महिला तिथून निघून जाते.
महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्वत: पीडितेने सांगितला आहे. तिने कॅप्शनमध्ये तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. सध्या या घटनेने संपूर्ण सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने म्हटले आहे की, महिला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सुरक्षित राहिल्या नाहीत आता, तर दुसऱ्या एकाने अशा लोकांना त्या ठिकाणी मारले पाहिजे म्हणजे कळेल, तर काहींनी महिलेची माफी मागितीली आहे. सध्या हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.