नवी दिल्ली : सध्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Iran) आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Microsoft CEO Bill Gates) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) चर्चेत आहे. ज्यामध्ये स्मृती इराणी बिल गेट्सला खिचडी बनवताना शिकवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या खूप पसंतीस पडला आहे. हा व्हिडिओ स्मृती इराणीने तिच्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवरून शेअर केला आहे.
Recognising the Super Food of India and its POSHAN component..
When @BillGates gave tadka to Shree Ann Khichdi! pic.twitter.com/CYibFi01mi
— Smriti Z Irani (@smritiirani) March 2, 2023
व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतातील सुपर फूड आणि त्यातील पौष्टिक घटक जाणून घेणे. जेव्हा @BillGates ने श्री अण्णा खिचडीला तडका दिला!” ज्यामध्ये बिल गेट्स आणि स्मृती इराणी यांचाही समावेश होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्मृती इराणी अब्जाधीश बिल गेट्स यांना खिचडीमध्ये तडका कसा लावायचा हे शिकवताना दिसत आहे. यानंतर बिल गेट्स देखील स्वतःच्या हाताने खिचडीची चव चाखुन पाहताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे स्मृती इराणी यांनी शेअर केलेली ही पोस्ट आतापर्यंत ४ लाख ५२ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.