भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral
जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा प्रामुख्याने समावेश होतो. आपल्या विषाने तो कोणत्याही प्राण्याला क्षणातच मृत्यूच्या विळख्यात अडकवण्याचे सामर्थ्य ठेवतो. मोठमोठ्या प्राण्यांनाही न घाबरणारा साप कधी स्वत:च्या प्रजातीचीही शिकार करु शकतो ही बाब नक्कीच धक्कादायक आहे. सापाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज तुम्ही सोशल मिडियावर शेअर होताना पाहिले असतील पण सापाने सापाचीच शिकार केल्याचे दृश्य तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, हे भयानक दृश्य आता इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे. एक सापाने दुसऱ्या सापाची अशी शिकार करणं सर्वांसाठीच धक्कादायक होत ज्यामुळे वेगाने हे दृश्य सोशल मिडियावर शेअर केलं गेलंं. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक साप दुसऱ्या सापाला आपल्या तोंडात पकडून त्याची शिकार करताना दिसून आला. व्हिडिओत सापाने दुसऱ्या सापाचे तोंड आपल्या तोंडात पकडल्याचे दिसते. तो हळूहळू त्याच्या संपूर्ण शरीराला गिळंकृत करतो आणि सर्वच दृश्य फार थरारक वळण घेते. शिकारी साप घराला लटकला असून दुसऱ्या सापाचे अर्धे शरीर हवेत तर अर्धे शरीर सापाच्या तोंडात असते. हळूहळू करून तो आपल्या तोंडात त्याला सामावून घेत असतो. तज्ञांचे म्हणणे आहे की साप बहुतेकदा त्यांच्या स्वतःच्या प्रजाती खाण्यास प्राधान्य देतात. हे विशेषतः तेव्हा खरे आहे जेव्हा मोठे साप अन्नटंचाईचा सामना करतात किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रदेशावर वर्चस्व गाजवू इच्छितात. अशा परिस्थितीत, मोठे साप कमी शक्तिशाली सापांची शिकार करू शकतात.
pic.twitter.com/n1udcuYLro — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) October 2, 2025
सापाच्या या शिकारीने आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून याचा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बापरे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे त्याने काय केलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याला माहिती आहे का तो कुणाला खात आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.