(फोटो सौजन्य: Instagram)
रामलीला कार्यक्रम गावाकडे खूप खेळवले जातात. हे एक पारंपरिक लोकनाट्य आहे जे नवरात्रीत सादर केले जाते. यात भगवान रामाच्या जीवनावरील कथा नृत्यांच्या आणि लोकसंगीताच्या स्वरूपात लोकांसमोर मांडली जाते. नुकताच सोशल मीडियावर अशाच एका रामलीलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात कथेतील महत्त्वाची भूमिका असणाऱ्या शूर्पणखेचा एक अनोखा अंदाज दिसून आला. आधुनिक शैलीत शूर्पणखा यात “तडपाओगे तडपा लो” या ट्रेडिंग गाण्यावर लक्ष्मणाला भुरळ घालण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. या दृश्यांमुळे लोक चांगलीच हैराण झाली आणि सर्वांनी व्हिडिओला शेअर करण्यात सुरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रामायणासारखी पवित्र आणि धार्मिक कथा कशी सादर केली जात आहे याबद्दल लोकांमध्ये वादविवाद सुरू झाला आहे. काहींचे म्हणणे आहे की हे रामायणाच्या पावित्र्याचे आणि श्रद्धेचे उल्लंघन करते. त्यांचा असा विश्वास आहे की अशा आधुनिक रूपांतरांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि रामायणाचे भविष्य खूप चिंताजनक असू शकते. दरम्यान, काही लोक या व्हिडिओला मनोरंजनाचा एक प्रकार मानत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की रामलीलामध्ये नवीन बदल आणि आधुनिक स्पर्श जोडण्यात काहीही गैर नाही. ते म्हणतात की हा केवळ तरुण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आणि त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर आपले विचार शेअर केले आहेत.
धीरे-धीरे रामायण भी बदल रही है
आने वाले 20 साल में रामायण की स्थिति बहुत चिंता जनक हो जाएगी इस तरह की रामायण पर आप क्या कहना चाहोगे यह रोल लक्ष्मण और शूर्पणखा का है pic.twitter.com/Oy1yJEpxzh — Bhanu Nand (@BhanuNand) September 30, 2025
या अनोख्या सादरीकरणाचा व्हिडिओ @BhanuNand नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मॉडर्न शूर्पणखा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कलियुग त्याच्या शिखरावर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शूर्पणखा देखील ऍडव्हान्स झाली आहे, वेष बदलून लक्ष्मणला आकर्षित करण्यासाठी येत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.