अरे देवाला तरी जरा घाबरा! गुटखा प्रेमींसाठी खास, व्यक्तीने बनवला विमल ऑम्लेट, लोक म्हणाले "याला खायचं की थुकायचं?"; Video Viral
खाद्यप्रेमींना अनेकदा काहीतरी नवीन ट्राय करू पाहत असतात. त्यांच्या या फॅडमुळेच बाजारातील अनेक दुकानदार आपल्या फूड स्टॉलवर नवनवीन पदार्थ ठेवत आहेत. मात्र हा ट्रेंड आता इतका घातक ठरत चालला आहे की काही नवीन करायच्या नादात लोक काहीही करू लागले आहेत. स्ट्रीट वेंडर्स अत्र-विचित्र फूड आपल्या दुकानात ठेवू लागले आहेत, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसावा.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही हे फूड एक्सपेरिमेंट नक्कीच पाहिले असतील, कधी ओरिओ भाजी, तर कधी फँटा मॅगी आणि आता तर हद्दच पार झाली. एका व्यक्तीने आपल्या स्टॉलवर चक्क गुटका ऑम्लेट ठेवायला सुरुवात केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यातील दृश्यांनी हादरून गेले आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
आजपर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑम्लेट खाल्ले असतील.पण तुम्ही कधी गुटख्यासोबत ऑम्लेट खाल्ले आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच एक ऑम्लेट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका ग्लासात दोन अंडी फोडताना दिसून येतो यानंतर तो यात दोन गुटख्याची पाकिटं टाकतो. यानंतर तव्यावर तेल टाकून तो त्यात एक गुटख्याच पाकीट ओततो मग पुन्हा ऑम्लेट तयार झाल्यावर तो शेवटी आणखीन एक गुटख्याच पाकीट त्यावर टाकतो. असे एकूण चार पॅकेट गुटखा तो ऑम्लेटमध्ये टाकून खाण्यासाठी सर्व्ह करतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून खवय्ये यावर भयंकर संतापले आहेत. हा ऑम्लेट चवीला कसा असेल तर ठाऊक नाही पण हा ऑम्लेट खाऊन मृत्यूला नक्कीच आमंत्रण दिले जाईल.
विमल ऑम्लेटचा हा व्हिडिओ @shubhamkhatana_54 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्य असून अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याला खायचं आहे थुकायचं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यांचे चाळे बघता जग खरंच संपणार आहे असं वाटतंय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.