(फोटो सौजन्य: Instagram
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. मागील काही काळापासून सोशल मीडियावर Pokiee ट्रेंड फार चर्चेत होता. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही खास केले किंवा त्याची काळजी घेतली तर त्याला पुकी हे विशेषण दिले जाते. असेच एक पुकी काका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. काकांच्या या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले असून यात त्यांनी आपल्या बेगमसाठी असे काही करून दाखवले की पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात काही पुरुष व्यक्ती बसून काही चर्चा करत असल्याचे दिसून आले. या सभेत सर्वात लक्षवेधी ठरले ते म्हणजे काका, ज्यांनी आपल्या बायकोची हाय हिल्स सॅंडल घालून सभेला हजेरी लावली. त्यांची ही हाय हिल्स पाहून सर्वच आवाक् झाले तर काहींना आपले हसू आवरता आले नाही. हाय हिल्स घालून बसलेल्या काकांचा व्हिडिओ तेथील एकाने आपल्या कॅमेरात कैद आणि मग सोशल मीडियावर शेअर केला. काकांचे हे अनोखे रूप पाहून इंटरनेटवर हास्याचा कल्लोळ उठला आणि लोकांनी वेगाने हा व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. काहीजण काका जान घाईगडबडीत आपल्या बेगमची चप्पल घालून आल्याचे म्हण लागले तर काहीजण काकांना या चपला फारच आवडल्या असतील असे म्हणू लागले.
चाचा जान यांना त्यांच्या पत्नीच्या सँडल घालून बैठकीच्या खोलीत पाहून तिथे उपस्थित असलेले लोक सुरुवातीला आश्चर्यचकित झाले पण नंतर सर्वांनाच यावर हसू अनावर झाले. हा व्हायरल व्हिडिओ @supermemecompany नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून हजारो युजर्सने व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. अनेक युजर्सने यावर आपल्या कमेंट्स देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पुकी चाचा” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “व्वा काका व्वा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.