जिभेला खरंच धार असावी...! मुलीने भलीमोठी तलवार उचलली अन् थेट तोंडाच्या आत घुसवली; धक्कादायक स्टंट पाहून उडेल थरकाप; Video Viral
सोशल मीडियाच्या जगात दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. लोक व्हायरल होण्यासाठी अनेक नको नको ते प्रकार करू पाहतात आणि असाच एक नवीन पराक्रम आता इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणीने असे काही करून दाखवले जे पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. तिच्या या स्टंटने लोकांचे लक्ष तर वेधलेच शिवाय लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअरही करायला सुरुवात केली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
आईच्या मायेपुढे हरला राक्षस! वासरला वाचवण्यासाठी बिबट्याशी गाईचे दोन हात; थरकाप उडवणारा Video Viral
काय घडलं व्हिडिओ?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एका मुलीने आपल्या हातात भलीमोठी तलवार घेतल्याचे दिसते. यावरूनच ती काहीतरी स्टंट करणार याचा अंदाज आला पण ती इतकं भीषण काहीतरी करेल याची कुणीही कल्पना केली नाही. व्हिडिओमध्ये सुरवातीला मुलगी तलवार हातात घेऊन तिला आपल्या जिभेने चाटते आणि मग पुढच्याच क्षणी ही तलवार आपल्या तोंडात घुसवते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अख्खीच्या अख्खी भलीमोठी तलवार ती सहज आपल्या तोंडात आत घुसवत जाते आणि मग ही तलवार तोंडातून बाहेरही काढून दाखवते. तिचा हा पराक्रम आता युजर्सना चांगलाच धक्का देत असून लोक हा व्हिडिओ आता वेगाने शेअर करत आहेत. दरम्यान तलवार गिळण्याची ही कला प्राचीन कला असल्याचे म्हटले जात आहे जी भारत, इजिप्त आणि इतर देशांमध्ये शतकानुशतके प्रचलित आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @genius.ex नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “का मला आश्चर्य वाटतं की हे झालं कसं?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दीदीपासून वाचून राहावं लागेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे नक्की काय होत?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.