आईच्या मायेपुढे हरला राक्षस! वासरला वाचवण्यासाठी बिबट्याशी गाईचे दोन हात; थरकाप उडवणारा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे प्राण्यांचे पक्ष्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यामध्ये जंगली प्राण्यांचे शिकारीचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या असाच एक बिबट्याच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिबट्या हा एक हिंसक प्राणी आहे. अगदी वाऱ्यासारखा धावत येऊन शिकार कधी करुन जातो हे देखील कळणार नाही. वाघ-सिंहाला देखील अनेकदा चकवा देऊ शकतो. पण आज या बिबट्याच्या शिकारीचा डाव त्याच्यावर उलटला आहे. कारण त्याच्यासमोर एक आई उभी आहे, जी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव देखील धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका वासरावर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याने वासराचा गळा पकडला आहे. वासरु मोठ मोठ्याने ओरडत आहे. बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी झटपटत आहे, पण बिबट्या वासराला सोडायला तयार नाही. इतक्यात आपल्या बछड्याचा आवाज ऐकून त्याची आई गाई धावत येते. मात्र तिला पाहताच बिबट्या वासरला सोडून पळून जातो. सध्या या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हीच खरी आईच्या प्रेमाची ताकद आहे, तिच्यापुढे तिच्या पिल्लांना हात लावण्याची कोणमध्ये धमक नसते. आता या गाईने पहा कसे एका बिबट्याला पळवून लावले आहे.
मेरी प्यारी मां!
गाय के बछड़े को गर्दन से पैंथर ने दबोचा तो बचाने मां दौड़ी। फिर क्या था, खुद देखिए।
📍 बाली, पाली pic.twitter.com/K9MVH7qqKm — Arvind Sharma (@sarviind) August 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sarviind शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओवरुन लक्षात येते की, आईही आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. केवळ मानवातच नव्हे तर पसु-पक्ष्यांमध्ये देखील हे दृश्य दिसून येते. या व्हिडिओ अनेकांनी आई ही आईच असते, आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आईचं काळीज! पिल्लांसाठी थेट सिगल पक्ष्याशी भिडली ; असं केलं रक्षण, पहा थरारक झुंजीचा VIDEO
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.