पिल्लू पाण्यात पडताच सिंहिणीचा जीव झाला कासावीस, डोळ्यात साठले अश्रू अन् शेवटी जे घडलं... Video Viral
जगात सर्व नात्यांहून वेगळे आई-लेकाचं नातं असत. ममतेने भरलेली ही आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जायला मागे पुढे पाहत नाही. आईचे हे नाते फक्त माणसांमध्येच नाही प्राण्यांमध्येही तितकेच असते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एका सिंहीणीचे पिल्लू तलावात पडल्याचे दिसून येत. आपल्या पिल्लाला असे पाण्यात पडल्याचे पाहताच सिंहीण घाबरते आणि जिवाच्या आकांताने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते. व्हिडिओत नक्की पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये एक सिंहीण आणि तिचे पिल्लू बोलत असताना अचानक सिंहिणीकडून आपल्या पिल्लाला धक्का लागतो आणि तिचे पिल्लू पाण्यात पडते. आपल्या पिल्लाला पाण्यात पडल्याचे पाहताच सिंहीण घाबरते आणि तिच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते. हे दृश्य लोकांना इतकं दुःखी आणि भावूक करत आहे.
व्हिडिओमध्ये सिंहिणीचे पिल्लू पाण्यात पडल्यानंतर ती घाबरलेली दिसते आणि आपल्या पिल्लाला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते. आपल्या तोंडाने ती आपल्या पिल्लाला पकड्ण्याचा प्रयत्न करते मात्र अनेकदा तिचे प्रयत्न अयशस्वी ठरतात आणि पिल्लू तिच्या हातून निसटून पुन्हा पुन्हा पाण्यात पडते. हे संपूर्ण दृश्य फारच चिंताजनक वाटू लागते. यावेकी सिंहिणीच्या चेहऱ्यावरही चिंता स्पष्टपणे दिसून येते. अखेर पुढे पिल्लाला पकडण्यास ती यशस्वी ठरते आणि त्याला पाण्याबाहेर काढते. यानंतर आपण पिल्लाला आईला घाबरून पाळताना पाहू शकतो.
A lion pushes its child without knowing it is water pic.twitter.com/FthnO5Rt9t
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 10, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अतिप्रयत्न 30 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते पिल्लू आयुष्यभर हा अनुभव लक्षात ठेवेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती देखील इतर आईंप्रमाणे असेल तर ती नक्की विचारेल, पण तू पोहायला शिकलास ना?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.