(फोटो सौजन्य: Instagram )
साप किती धोकादायक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. फक्त माणसांनाच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही तो आपल्या एका दंशाने मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात त्याच्यापासून चार हात लांब राहणेच शहापणाचे ठरते. अशातच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका रीलसाठी लहान मुलाच्या अंगावर विषारी साप टाकल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आता इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. लोक आता यावर जोरदार टीका करत आहेत.
काय आहे व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मूल सापाशी खेळताना दिसत आहे. साप विषारी असो वा नसो, त्याला लहान मुलाजवळ सोडणे धोक्याचे ठरू शकते. हा व्हिडिओ केवळ एक रील आणि काही दृश्यांसाठी बनवण्यात आला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर लोक हे पाहून भडकले, व्हिडिओमध्ये मुलगा सापाला स्वत:पासून दूर ढकलताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये, मुलगा आधी स्वतःच्या गळ्यावरून सापाला खाली फेकताना दिसून येतो. यानंतर तो न घाबरता सापाची मान पकडतो आणि काही क्षणातच त्याला सोडून देतो. मुलगा इतका लहान असतो की त्याला सापाच्या थरारकतेची कल्पना नसावी. व्हिडिओच्या शेवटी मुलगा उठून सापाला आपल्यापासून वेगळे करतो आणि सापही गुपचूप तेथून निघून जाताना दिसून येतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून हैराण झाली आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @vivek_choudhary_snake_saver नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलांचे नुकसान होईल इतकं करू नकोस, मुलांकडे लक्ष दे, भाऊ, फक्त एका लाईकसाठी मुलांचं काहीतरी होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे , “कृपया असे करू नका, साप मुलाला मारून टाकेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.