(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. आताही इथे एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो लोकांच्या हास्याचे कारण बनत आहे. इंटरनेटवर प्राण्यांच्या थरारक लढतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील दृश्ये बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात मात्र आता इथे एक रोमांचक पण तितकीच मजेदार अशी अनोखी फाइट व्हायरल झाली आहे ज्यात दोन मांजरी एकमेकांविरुद्ध भिडताना दिसून येत आहे. या फाइटची खरी रंगात तेव्हा वाढते जेव्हा यात कावळा आणि एक कुत्रा एंट्री घेतो. प्राण्यांच्या या ड्राम्यात पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
तर व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मांजरी पार्किंगमध्ये भांडत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक कावळा आणि एक कुत्रा त्यांच्यामध्ये येऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून लोक हैराण झाले आहेत आणि व्हिडिओचीही मजाही लुटत आहेत. व्हिडिओतील दृश्ये पाहून असे दिसते की संपूर्ण प्राणी साम्राज्य हा लढा थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे, जे खरोखर एक आनंददायक आणि अद्वितीय दृश्य आहे.
व्हिडिओमध्ये कावळा आणि कुत्र्याची भूमिका सर्वात मजेदार आहे. कुत्रा भांडत असलेल्या मांजरींमध्ये उडी मारताना दिसत आहे आणि कावळा वरून ओरडत आहे, जणू काही तो बाजूने मदत करत आहे. हा सीन इतका मजेदार आहे की लोक कमेंटमध्ये लिहित आहेत, “हा खरा आहे की चित्रपटाचा सीन?” हा आंतरप्रजातींचा संवाद आता लोकांना आश्चर्यचकित करणारा आहे. व्हिडिओतील दृश्ये फार हास्यास्पद आहेत जी क्षणात तुम्हाला याच्या प्रेमात पाडू शकतात. याचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक तो आता वेगाने शेअर करत आहेत.
The whole animal Kingdom tried to stop the fight 😂 pic.twitter.com/H3pVsrT2Br
— The Instigator (@Am_Blujay) December 30, 2024
प्राण्यांचा हा मजेदार व्हिडिओ @Am_Blujay नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘संपूर्ण प्राण्यांच्या साम्राज्याने लढाई थांबवण्याचा प्रयत्न केला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “कथेचा अर्थ. मांजरींशी भांडण संपवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डॉगीस्टाईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप मजेदार आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.