मालकाने चक्क आपल्या हत्तीचा साजरा केला वाढदिवस! फळांपासून बनवला केक, गजराजने फुक मारत विझवली कँडल; Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. नुकताच असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका मालकाने आपल्या हत्तीचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. इतकेच काय तर हत्ती देखील व्हिडीओत आपल्या वाढदिवसाची मजा लुटताना दिसून आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून सुखावले आहेत.
आपल्या हत्तीचा हा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालकाने फळांनी बनवलेला एक सुंदर केक तयार केला. व्हिडिओतील निरागसता आणि हत्तीचा आनंद पाहून आता युजर्स भारावून गेले आहेत. आपल्या हत्तीचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी मालकाने कोणतीही कसर सोडली नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हत्तींसाठी तयार करण्यात आलेल्या या केकमध्ये केळी, सफरचंद, टरबूज, अननस अशा विविध प्रकारच्या फळांची सुंदर सजावट करण्यात आली होती. हा केक केवळ दिसायलाच अप्रतिम नव्हता, तर हत्तीसाठी अतिशय आरोग्यदायी पदार्थही होता. मालकाने हा केक हत्तीला दिला आणि पुढे जे घडले ते पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले.
फळांनी भरलेला हा केक हत्तीने समोर पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. व्हिडीओमध्ये हत्ती आपल्या सोंडेने फळे उचलून मोठ्या उत्साहाने खाताना दिसत आहे. त्याची निरागस शैली आणि उत्साह पाहून तो खरोखरच आपला वाढदिवस साजरा करतोय असे वाटले. मालकही जवळच उभा राहून तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. हे दृश्य इतकं मनमोहक होतं की लोक याचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर करू लागले.
हत्तीचा हा व्हिडिओ @thebharatpost नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्राणी इतके गोंडस आणि निष्पाप का असतात, खरंच मानव त्यांच्याकडून काहीतरी शिकू शकतील अशी इच्छा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सर्व पुरुष समाजात आनंदाची लहर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.