(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर सध्या एका भीषण घटनेने नोंद घेतली आहे. वास्तविक, ग्रेटर नोएडातील एका गर्ल्स हॉस्टेलला गुरुवारी संध्याकाळी आग लागली, त्यामुळे संपूर्ण परिसर धुराने भरला होता. एका तासाच्या संघर्षानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन विभागाच्या पथकाने सुमारे 40 विद्यार्थिनींना सुखरूप बाहेर काढले. घटनेच्या वेळी वसतिगृहात सुमारे 160 विद्यार्थिनी होत्या.
कंडिशनर कॉम्प्रेसरमध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागताच वसतिगृहातील मुली घाबरल्या आणि आपला जीव वाचवण्यासाठी इथून तिथून पळू लागल्या. इमारतीच्या भिंतींना तारेचं कुंपण होत ज्यामुळे मुलींना तिथून बाहेर पडत आलं नाही. याकारणामुळेच शेवटी काही मुलींनी इमारतीवरून उड्या मारत आपला जीव वाचवला. अशाच उड्या मारणाऱ्या काही मुलींचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. हा थरारक व्हिडिओ पाहून आता युजर्स आवाक् झाले आहेत आणि मुलींच्या धैर्याचे कौतुक करत आहेत.
सदर घटना ही अन्नपुर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये घडून आली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एक एक करत खाली उड्या मारत आहेत. यापैकी एका मुलीचा खाली उतरताना तोल ढासळला ज्यामुळे ती खाली आदळते. दुसऱ्या मुलीनं धीर करून कुंपणाच्या पलिकडे उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण तिला भिंत ओलांडता आली नाही. त्यामुळे ती सुद्धा खालीच पडते. तिसरी मुलगी मात्र आपला जीव यात सफल होते. यावेळी अग्निशामल दलाने इमारतीच्या खाली एक शिडी लावल्याचे दिसते जेणेकरून मुली त्यावर चढून तिथून बाहेर पडू शकतील. सुदैवाने या घटनेत कुणाचाही जीव गेला नाही तर किरकोळ दुखापती झाल्या.
#GreaterNoida : Fire broke out in Annapurna girls hostel around 5 pm on Thursday evening due to blast in AC and spread wildly engulfing the hostel, forcing the girls residing in the hostel to jump to safety from second floor of the building.
One girl fell to the ground while… pic.twitter.com/0CORmcUM2f
— Saba Khan (@ItsKhan_Saba) March 28, 2025
या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहेत. घटनेचा व्हिडिओ @ItsKhan_Saba नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे . व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे तर अनेकजण हा व्हिडिओ आता वेगाने शेअर करत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.