एक अनोखे रक्षाबंधन! महिलेने बिबट्याला बांधली राखी, प्राण्यानेही सोडली नाही संधी लगेच हात केला पूढे अन्य... मजेदार Video Viral
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे माणसामाणसांत जसा प्रेमभाव दिसतो, तसाच निसर्गाविषयीही आत्मीय भाव जाणवतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत झाडे, सूर्य, पर्वत, प्राणी, पक्षी अशा निसर्गाच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते. आजही देशातील अनेक भागांत माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातली अनोखी मैत्री पाहायला मिळते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रक्षाबंधनाचा दिवस साजरा करताना दिसून येत आहे पण कोणत्या व्यक्तीसोबत नाही तर चक्क एक घायाळ बिबट्या तिने आपला भाऊ मनात त्याला राखी बांधताना ती व्हिडिओत दिसून आली आहे. बिबट्या सारखा धोकादायक शिकारी ज्याला पाहताच लोक पळू लागतात अशा जंगलातील शिकाऱ्याला महिला राखी बांधत असल्याचे पाहून युजर्सना मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या व्हिडिओची खासियत म्हणजे माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील प्रेमाचे नाते… जे भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. व्हिडिओ राजस्थानमधील असून यात एक महिला आजारी बिबट्याला वन विभागाकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्याच्या पुढच्या पायावर राखी बांधताना दिसते. हा बिबट्या यावेळी आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेरचा निरोप घेत असताना महिला बिबट्याला राखी बांधते आणि आपला भाऊ बनवत त्याचा निरोप घेते. राखीच्या दोऱ्याने बांधलेले हे भावा बहिणीचे अनोखे नाते आता सोशल मीडियावर चांगलेच लक्षणीय ठरत आहे.
दरम्यान हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रीभावासोबत कधी भांडण झालं तर…?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फारच सुंदर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.