(फोटो सौजन्य:istock)
सिंह जरी जंगलाचा राजा असला, तरी त्याच्या बुद्धीचं देखील तोड नाही. एखाद्या व्यक्तीचं शरीर कितीही मजबूत असलं, पण बंदूक आणि विषासमोर सगळं व्यर्थ ठरतं. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दोन सिंह हे वास्तव अगदी ओळखतात. त्यांना माहीत असतं की ताकद असूनही जर कोबऱ्याशी पंगा घेतला, तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. सध्या किंग कोब्रा, सिंहिण आणि पाल हे तिन्हीही प्राणी एकत्र भिडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. कोब्रा पालीची शिकार करत असतानाच तिथे या दोन सिंहीण येतात आणि कोब्राला पाहताच त्या घाबरून जातात.
काय घडलं व्हिडिओत?
बहुतेक असं झालं असावं की कोब्रा पालीचा पाठलाग करत होता, आणि त्याच वेळेस सिंहिणींची तिथे एंट्री झाली. सिंहांनी सापावर नजर ठेवली, ज्यामुळे सापाचं लक्ष पालीवरून हटलं. साप आणि सिंह यांच्यातील तणाव थोडा कमी झाला, आणि त्याच वेळी पाल सिंहांसमोर आली. सिंहीणी मात्र या सगळ्या घडामोडींमुळे पुरते गोंधळलेले आणि आश्चर्यचकित झाल्या. व्हिडिओमध्ये सिंहीण कोब्राला पाहताच घाबरून तिथे थांबतात, एक सिंहीण तर मागे वळून पाळताना दिसते पण दुसऱ्या सिंहिणीला थांबताना पाहून तीही तिथे थांबू लागते. दुसरी सिंहीण जवळ जाऊन कोब्रा काय करतोय हे पाहण्याचा प्रयत्न करते पण असं करताना तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसून येते. सिंहिणी ज्यांना जंगलाच्या राणीची उपमा दिली जाते त्या अशा किंग कोब्राला घाबरत आहेत हे पाहून युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा व्हिडिओ @daniel_wildlife_safari नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सावध राहा तरुण सिंहांनो.. नाग धोकादायक आहे, हे दृश्य किती सुंदर आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उही आतापर्यंतची सर्वात छान गोष्ट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना घाबरताना पाहून बरं वाटलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.