अरे यमराजाला तरी घाबर! तरुणाने थेट मधमाशांच्या पोळ्यातच घातला हात; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्; Video Viral
The young man put his hand directly into the bee hiveसोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात, कधी हसवतात तर कधी थक्क करत जातात. इथे लोक अनेकदा अशा गोष्टी शेअर करतात ज्यांचा आपण कधी कल्पनाही केली नसेल. आताही इथे असेच काहीसे झाले आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो सध्या सर्वांना हैराण करत आहे. यात एक मुलगा चक्क मधमाशांच्या पोळ्याला हात लावताना दिसून आला आणि मुख्य म्हणजे यावेळी त्याने कोणतेही सुरक्षा साधने आपल्या सोबत ठेवली नव्हती. हे सर्व दृश्य पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
मधमाशी आणि तिच्या डंकाला घाबरत नाही असा क्वचितच कोणी असेल. लोकांना मध आवडतो, पण सर्वांनाच मधमाश्यांची भीती वाटते. मधमाशांचं पोळ अनेकांना त्याकडे आकर्षित करत मात्र यावर असलेल्या मधमाशांमुळे लोक त्याजवळ जायला घाबरतात. मधमाशी आकाराने लहान असली तरी तिचा डंक आपल्याला मोठी दुखापत करू शकतो. अशातच नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक मुलगा न घाबरता भल्यामोठ्या मधमाशीच्या पोळ्यात हात घालताना दिसून आला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जराही भीती नव्हती आणि हसत हसत ती पोळ्यांवरील मधमाशांना आपल्या हाताने दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. त्याचे हे कृत्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून हा व्हिडिओ नक्की कुठला आहे अद्याप समजलेले नाही.
Cameraman never dies 👺😱 pic.twitter.com/bXF3e0IUML
— ᴊʜᴀɴᴛᴜ ᴊᴇᴛʜᴀ❕️ (@Jhantu_jetha) May 6, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Jhantu_jetha नावाच्या एक्स अकाउटंवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मधमाशी त्याला चावत का नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा ती बॉर्डरवर लढण्यासाठी जा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा