(फोटो सौजन्य – X)
सध्या लग्नांचा सीजन सुरु आहे. आता लग्न म्हटलं की, या एका सोहळ्यात अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. अजब-गजब उखाणा, लग्नातील डान्स, प्रँक असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता मात्र बिहारच्या एका अनोख्या लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या पत्रिकेत काही अशा गोष्टी नमूद केल्या गेल्या ज्या पाहून सर्वांनाच आपले हसू अनावर झाले. आता यात नक्की काय लिहिलं आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे लग्नपत्रिकेत?
बाजारात अनेक प्रकारच्या लग्नपत्रिका उपलब्ध आहेत आणि लोक त्यांना आवडणाऱ्या कार्डचा प्रकार निवडतात आणि त्या कार्डचा वापर करून लग्नाचे आमंत्रण पाठवतात. लग्नाच्या कार्डांमध्ये क्रिएटिविटी दाखवणे काही नवीन गोष्ट राहिली नाही. प्रत्येकजण काही तरी नवीन करण्यासाठी बऱ्याच नवनवीन आणि हटके स्टाईलच्या लग्नपत्रिका बनवू पाहत. तथापि, आज तुम्हाला अशा एका कार्डविषयी सांगत आहोत जे तुम्ही आजवर कुठेही पाहिले नसेल.
व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या कार्डमध्ये तुम्हाला दिसेल की जिथे वधू-वरांची नावे आणि परिचय लिहिलेला आहे, तिथे वराचे नाव ‘अकाउंटंट प्रायव्हेट लिमिटेड’ असे लिहिले आहे. तर वधूच्या नावासमोर लिहिले आहे – ‘TRE-4 चा उमेदवार’ असे लिहिले आहे. याचा अर्थ असा की वधूची शिक्षिका होण्याची तयारी सुरू आहे. जी पदवी आपल्याकडे नाही ती गोष्ट अशी पत्रिकेत लिहिणे लोकांना काहीसे विचित्र वाटले. पण खरी मजा तर लग्नपत्रिकेवरील शायरीने जिंकली. तुम्हाला सांगतो की यात एक शायरी देखील आहे ज्यात लिहिले आहे की – ‘पूरी खाके, रसगुल्ले खाके, कॉफी पीके जाना जी, मेली मौसी की शादी में जुलूल-जुलूल आना जी’. हास्यास्पद वाटणाऱ्या या शायरीने सर्व सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधले आणि लोकांना खळखळून हसवले.
#गजब_रे_गजब @BPSCOffice pic.twitter.com/cJWPvvvXQz
— छात्र-युवाओं की आवाज🇮🇳 (@CYKAinBihar1) May 1, 2025
दरम्यान ही अनोखी लग्नपत्रिका @CYKAinBihar1 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. याला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले आहे, “मूर्ख मुली, हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे आणि जर ती शिक्षिका झाली नाही तर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” वा रे, अशिक्षित मूर्खपणा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.