तरूणाचा स्टंट दाखवण्याचा प्रयत्न असा काही फसला की...; तुम्हीच पाहा काय झाले?
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा आपण असे व्हिडिओ पाहतो ज्यामुळे आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आपले मनोरंजन होते. तसेच स्टंट करणाऱ्यांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेकदा हे स्टंट करणारे कोणताही विचार न करता आपला जीव धोक्यात घालतात. यासोबतच इतरांचाही जीव धोक्यात अणतात. कधी आगीसोबत, तर कधी बाईक स्टंट करतात.अनेकदा उंच टेकडीवर जाण्याचा स्टंट देखील करतात. असे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही तरूणांचा आहे. एकमेंकांना स्टंट करून दाखवण्याच्या नादात एका मुलाला स्टंट फसला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुले नदीपाशी एक ब्रीजवर दिसत आहेत. तर काही मुले ब्रीजखाली दिसून येत आहेत. ही मुले ब्रीजच्या एका खांबावर फ्लिप मारून एकमेकांना दाखवता आहे. यामध्ये काही तरूण मुले आणि अल्पवयीन मुले असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकजण एक एक करून फ्लिप मारून दाखवत आहे. तेवढ्यात एक अल्पवयीन मुलगा देखील तिथे असतो. तो देखील फ्लिप मारून दाखवतो. तो फ्लिप मारतो पण, परत सरळ होताना खाली पडतो. तिथे खाली उभा असलेला मुलगा त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण तो डोक्यावर पडमार असतो तेवढ्यात आणखी एक मुलगा येऊन त्याला पकडतो. यामुळे त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर evil__jumper___ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आता ही लहान मुले देखील स्टंट करू लागली आहेत, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तरीही भावाची हिरोगिरी गेली नाही, हसत आहे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे तर काहीच नाही मी यापेक्षा उंचावरून फ्लिप मारू शकतो. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, या तरूणांनी आता बारक्या पोरांना देखील विळख्यात घेतले आहे. सगळेजण सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.
हे देखील वाचा- रतन टाटा यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल; वाचून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले