फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा लोक फेमस होण्यासाठी व्हयूज मिळवण्यासाठी इतके विचित्र स्टंट करतात की पाहून विश्वास बसत नाही. या जगात विचित्र लोक आहेत पण सध्याचा सोशल मीडियावर फेमस होण्याचा रोग लोकांना जास्तच वेडे लावत आहे. कोणीही काहीही कंटेट क्रिएट करताना दिसत आहे. आत्तापर्यंत असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.
काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती चपातीवर शेण लावून खाताना दिसत होता. त्याचाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो तरूण आता ब्रेडला शेण लावून खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती चहा बनवत आहे. तो चहा बनून झाल्यावर कपात चहा गाळून घएतो. नंतर तिथे असलेले एक ब्रेडचा पुडा फोडतो. त्यातील दोन ब्रेड घेतो आणि कोणता तरी विचार करतो. मग तो अचानक ब्रेड आणि चहा घेऊन बाहेर गोठ्याच्या ठिकाणी जातो. तिथे जाऊन तो असे की ही करतो की त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तो अचानक ब्रेडला सॉस, बटर ज्याप्रमाणे आपण लावतो तसेच दोन्ही ब्रेडच्यामध्ये शेण लावतो. आणि मग तो खातो. त्यासोबतच तो चहा देखील पितो. हे करताना तो अगदी ते आवडल्यासारखे छान लागत असल्यासारखे खातो.
हे देखील वाचा –
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर armaan.tawer या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याच अकाऊंटवर त्या व्यक्तीचा आणखी एक चपातीला शेण लावून खातानाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आहे का कोणी टक्कर द्यायला. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही खरंच शेण खाता? दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, – असे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी तर्कशक्ती संपते. मला हसावे की रडावे ते कळत नाही. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, भाऊ, आता लोकांनी व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी शेण खाण्यास सुरुवात केली आहे. तर एकाने म्हटले आहे की, शेणाचे सँडविच आणि गरम चहा.