गर्दीचा फायदा घेत महिलेने दुकानातून केली चोरी, पकडले जाताच लोकांनी केली बेदम मारहाण; Video Viral
छोट्या रस्त्यांवर, गर्दीच्या ठिकाणी चोरी होणे एक सामान्य गोष्ट आहे. भरमसाट गर्दी पाहून चोर या ठिकाणी आणखीन सक्रिय होतात आणि संधी मिळताच वस्तू चोरायला सुरुवात करतात. अशात काहीवेळा ही चोरी यशस्वी होते तर काहीदा चोर रंगेहाथ पकडला जातो. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडून आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन तिने चोरी करण्याचा प्रयत्न केला खरा पण या प्रयत्नात ती सपशेल फेल झाली आणि यांनतर लोकांनी मिळून तिची मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका वर्दळीच्या रस्त्यावर लोकांची भारीच गर्दी जमल्याचे दिसून येते. व्हिडिओत एका महिलेने हातात काठी पकडल्याचे दिसून येते. महिला खूप रागात असते आणि याच काठीने ती जमिनीवर बसलेल्या एका महिलेला मारहाण करत असते. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने चोरी केल्यामुळे लोक तिच्यावर धावून आले आणि त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना दिल्लीतील रोहिणी मार्केटमध्ये घडून आली आहे. दुकानदारांनी तिला रंगेहाथ पकडले आणि सर्वांसमोर मारहाण करण्यास सुरुवात केली. दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एका काकू हातात काठी धरून महिलेवर राग काढताना दिसत आहे. ती महिलेला चोर म्हणत असते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, दिल्लीतील रोहिणी येथे घडलेल्या या घटनेवर युजर्सही आपले मत व्यक्त करत आहेत.
Woman Caught Stealing Phone, Beaten by Locals in Rohini Market, Delhi (D-12, Sector-7) pic.twitter.com/lD2ZcOxNlw — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 27, 2025
सदर घटनेचा व्हिडिओ हा @gharkekalesh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आमच्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला मारहाण करू नये, शेवटी महिला अशा वेदना सहन करू शकत नाहीत पण तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची शिक्षा देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अद्भुत चोर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.